सांगोला – इंधन व परकीय चलन बचती करिता कोल्हापूर-मिरज-पंढरपूर-कुर्डू
वाडी-लातूर मार्गावर रेल्वे सेवा वाढवाव्यात अशी मागणी सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
कोल्हापूर, मिरज, सांगली, कवठेमहांकाळ, ढालगाव, सांगोला, पंढरपूर भागातून दररोज हजारो वाहनांमधून लाखो लिटर पेट्रोल व डिझेल खर्च होत आहे. या इंधनासाठी देशातील कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन परदेशात जात आहे. त्याऐवजी रेल्वे वाहतूक वाढवल्यास पेट्रोल व डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल, रस्ते अपघात कमी होतील, पर्यावरण प्रदूषण कमी होईल, ग्रामीण व सीमाभागातील विकासाला मोठी चालना मिळेल, उद्योग, पर्यटन व रोजगार निर्मिती वाढेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गत अधिक मासा निमित्त व पुढील महिन्यात भरणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक प्रवास करून पंढरपूर येथे येतील. यावर खाजगी वाहनाचा वापर कमी व टाळण्याकरिता मुख्यमंत्री व रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर प्रत्येकी ४ तासाला रेल्वे गाड्या सुरू कराव्यात.
-निलकंठ शिंदे
Post Views: 16