पंढरपूर – येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शनिवारी तीनशे विद्यार्थ्यांसह वारकरी दिंडी व वृक्षदिंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
या दिंडी कार्यक्रमास प्रमुख उपस्थित पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधीर पटवर्धन , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहोळकर तसेच कमिटी मेंबर्स सौ. अपर्णा सुतार व सौ पल्लवी जाधव यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींचे तसेच पालखीचे पूजन करण्यात आले.
या दिंडीमध्ये सुमारे तीनशे मुलांनी सहभाग घेतला होता. काही विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्य,विठ्ठलाच्या गाण्यांवर नृत्य सादर केले. इयत्ता नर्सरी पासून बाल चिमुकले कोणी पांडुरंग, कोणी रुक्मिणी, कोणी मुक्ताई व वारकऱ्यांच्या वेशभूषेत आले होते. पांडुरंग रुक्मिणीची पालखी घेऊन ढोल ताशांच्या गजरात दिंडी ज्ञानोबा तुकाराम यांच्या गजरात पंढरपूर परिसरातून रस्त्याने अगदी आनंदाने उत्साहात फिरून आली. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांनी ‘एक पेड मॉं के नाम’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वृक्ष घेतले होते. छोट्या वारकऱ्यांनी रिंगण सादर केले.
याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी माननीय श्री सुधीर पटवर्धन आणि पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. मोहोळकर यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यासाठी प्रशालेच्या सर्व शिक्षकांनी खूप परिश्रम घेतले. त्यामध्ये सौ काळे,सौ जगताप, सौ जाधव, सौ पोरे, सौ शिंदे, सौ. दुरुगकर, सौ. चोबे, सौ. हुच्चे, सौ. वीरकर, सौ. शहा, क्षितिज मोहोळकर, पृथ्वीराज पाटील, निखिल घोडके, प्रवीण उत्पात इत्यादी होते.
Post Views: 30