
सोलापूर- नुकत्याच सोलापूरच्या उर्दू साहित्यकार, मासिक गुलबुटेचे संपादक फारूक सय्यद यांचे मुंबई येथे निधन झाले. त्यानिमित्त आज बज्मे गालिब ग्रंथालयातर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी शोकसभेच्या अध्यक्षस्थानी बज्मे गालिब ग्रंथालयाचे अध्यक्ष बशीर परवाज होते तर सचिव डॉ. हारूनरशीद बागबान, फारूक सय्यद यांचे भाच्चे डॉ. आसिफ इक्बाल, सीए मौलाना शेख आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी महिबुब कुमठे यांच्या कुरान पठाणाने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविक सचिव डॉ. हारून रशीद बागबान यांनी केले.
फारूक सय्यद यांनी एक गरीब घराण्यात जन्म घेतलेला माणूस महाराष्ट्राच्या उर्दू साहित्यात आपले नांव उज्जवल केले होते. त्यानंतर त्यांनी बाळगोपाळांसाठी एक खास मासिक पुस्तक गुलबुटे या नावाने सुरू केलेली होते. त्यात त्यांनी बाळगोपाळांना चांगले चांगले कसे द्यावे व इतर माहिती देण्यात येत होती. ते बारावीपर्यंतचे शिक्षण सोलापुरात पूर्ण केले त्यानंतर मुंबईत जाऊन पुढे शिक्षण चालू ठेवले व उर्दू साहित्य क्षेत्रात आपले नांव उंचावला. हे सर्व कार्य सोलापूर विसरणार नाही, असे मनोगत त्यांचे शिक्षक शाहबुद्दीन चितापुरे, अ. रशीद अर्शद, महिबुब कुमठे, सिराज मोमीन, वजाहत अ. सत्तार, महेमूद नवाज, इक्बाल सय्यद यांनी व्यक्त केले तर मीर अफजल मीर आणि हबीब नागपूरी यांनी त्यांच्या जीवनावर आपली कविता सादर केली.
यानंतर डॉ. आसिफ इक्बाल यांनी आपल्या मामाच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले की दिवंगत फारुक सय्यद यांच्या साहित्यीक कार्यावर सोलापूर विद्यापीठात संशोधन व पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली आहे. ही बाब आपल्या सोलापूरच्या साहित्यप्रेमासाठी अभिमानाची आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बशीर परवाज यांनी त्यांच्या उर्दू साहित्य कार्याला सोलापूर कधीही विसरणार नाही असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नासिरोद्दीन आळंदकर यांनी केले. शेवटी त्यांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.
























