Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चक्क चोरट्याने 3 लाख 15 हजाराच्या गॅस टाक्या नेल्या चोरुन

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in crime
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
चक्क चोरट्याने 3 लाख 15 हजाराच्या गॅस टाक्या नेल्या चोरुन

अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…..

मंगळवेढा – ब्रम्हपुरी येथे भारत गॅस एजन्सी आवारातून 3 लाख 15 हजार रुपये किंमतीचे 450 किलो वजनाचे 2 एलपीजी गॅस सिलेंडर व 5 लाखाचे महिंद्रा कंपनीचे पिकअप चोरुन नेण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी आनंद तानाजी पाटील यांचे ब्रम्हपुरी येथे गॅस एजन्सी दुकान असून दि.22 मे रोजी गॅस विक्री करता आवश्यकता असल्याने भारत पेट्रोलियम कंपनी लि.,सोलापूर येथून एलपीजी गॅसचे दोन नग प्रत्येकी 450 किलो वजनाचे सिलेंडर मागणी केली होती. सदरचे सिलेंडर हे महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक एम.एच.13 ई.पी.1074 मध्येच ठेवले होते. सदरचे वाहन गॅस कंपनीचे समोर पार्कींग करण्यात आले होते. रविवारी सुट्टी असल्याने गॅस एजन्सी बंद होती. सोमवार दि.25 मे रोजी सकाळी 10 वाजता नेहमीप्रमाणे फिर्यादी हे दुकान उघडण्याकरिता आल्यावर एजन्सीच्या समोर पार्किंग करण्यात आलेली पिकअप गाडी व दोन सिलेंडर गॅस दिसून आले नसल्याने त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते मिळून आले नसल्यामुळे कोणी तरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमतीवाचून चोरुन नेले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान सध्या गेल्या अनेक महिन्यापासून युध्द सुरु असल्यामुळे घरगुती गॅस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात गॅसला पर्याय म्हणून चुलीही पेटू लागल्या आहेत. येथे चक्क चोरट्याने गॅस पळवून नेल्यामुळे या परिसरात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे

—————.
नववधूने सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून केला पोबारा

शिक्षकासह अन्य तिघा विरुध्द गुन्हा दाखल…..

मंगळवेढा – बावची येथे एका नवविवाहित तरुणीने तीन महिने संसार करुन रोख रक्कम व सोन्याचे दागीने घेवून निघून गेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अश्विनी मारुती दानोळे (रा.देवरुख जि.रत्नागिरी) युवराज कांबळे,पिंटू उर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर (सर्व रा.रड्डे) यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात अर्थिक फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी नामदेव सुखदेव जाधव (रा.बावची,वय 38) याचे लग्न अश्विनी हिचे सोबत जमविण्याकरिता 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम घेवून 3 महिने संसार करुन दि.22 फेबु्रवारी 2026 घरातून फिर्यादीच्या आईचे दीड तोडा वजनाचे गंठण,रोख तीन हजार रुपये घेवून तिच्या गावी देवरुख जि.रत्नागिरी येथे निघून गेली आहे. दरम्यान अश्विनीचे पुर्वी लग्न झालेे असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी असल्याचे माहित असताना देखील लग्न जमविणारे पिंटू उर्फ नाना कोळेकर, शिवाजी गंगाराम कोळेकर,युवराज कांबळे गुरुजी आदींनी फिर्यादी सोबत लग्न लावून दिले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस हवालदार मनोज खंडागळे हे करीत आहेत.

Post Views: 61
Previous Post

पाठलाग करून तरुणीकडे केली शरीर सुखाची मागणी – बाप-लेकावर विनयभंगाचा गुन्हा 

Next Post

दिवसात चारशे दोन केसेस; तीन लाख १७ हजार चारशे रुपए दंडाची वाहनावर कारवाई

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
दिवसात चारशे दोन केसेस; तीन लाख १७ हजार चारशे रुपए दंडाची वाहनावर कारवाई

दिवसात चारशे दोन केसेस; तीन लाख १७ हजार चारशे रुपए दंडाची वाहनावर कारवाई

ताज्या बातम्या

प्रस्तावित कृष्णा खोरे योजनेतून बार्शी तालुक्यासाठी ५ टीएमसी पाण्याची शिफारस  -कार्यकारी संचालक धुमाळ 

September 6, 2026

माजी मंत्री विजय दादा मोहिते पाटलांची सपत्नीक अनोखी सवारी #marathinews #news

September 6, 2026

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1169890

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!