सोलापूर : पाठलाग करून तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका बाप-लेकाविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रफिक सलीम शेख (रा. कुमठा नाका, सोलापूर) आणि अमन रफीक शेख (रा. सदर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बाप लेकराचे नाव असून याबाबत पीडित तरुणीने खुद्द फिर्याद दिली आहे .
यातील फिर्यादी तरुणी ही ९ मे रोजी रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या दरम्यान कुमठा नाका परिसरातून जात होती. तेव्हा आरोपी रफिक शेख याने तिचा पाठलाग केला. त्यानंतर त्याने तरुणीला अडवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र, तरुणीने स्पष्ट नकार दिल्यानंतर रफिक संतप्त झाला. यानंतर त्याने तरुणीला अश्लील भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच तिचा गळा दाबून तोंडावर व डोळ्याजवळ मारहाण केली . यावेळी रफिक शेख याचा मुलगा अमन यानेही वडिलांना साथ देत तरुणीला शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे . फौजदार राजगुरू हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 4