सोलापूर – पाण्यात वाहून जात असलेले कपडे काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एका पन्नास वर्षाच्या व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना तिऱ्हे गावातील सीना नदी मध्ये आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली .
धोंडीबा दगडू गायकवाड ( वय 50 वर्ष , रा . तिऱ्हे ,उत्तर सोलापूर ) असे त्या मयत व्यक्तीचे नाव आहे . आज मंगळवारी सकाळी ते गावातील सीना नदी वर कपडे धुण्यासाठी गेले होते .कपडे धुताना कपडे पाण्यात वाहून जाऊ लागले असता धोंडीबा गायकवाड हे ते कपडे काढण्यासाठी पाण्यात उतरले . मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले . घरच्यांनी व इतरांनी त्यांचा पाण्यात शोधाशोध केला असता दुपारी त्यांचा मृतदेह मिळून आला . दरम्यान भाऊ राहुल गायकवाड यांनी सदरचा मृतदेह येथील शासकीय रुग्णालयात दुपारी दोन वाजता दाखल केला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
Post Views: 8