Wednesday, May 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आषाढी यात्रेत १६ जुलैपासून २४ तास दर्शन; भाविकांना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in west maharashtra
0
आषाढी यात्रेत १६ जुलैपासून २४ तास दर्शन; भाविकांना अत्याधुनिक दर्जाच्या सोयी-सुविधा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – सन २०२६ मधील आषाढी एकादशी शनिवार, दि.२५ जुलै रोजी साजरी होत असून पहाटे २.२० वाजता राज्याचे मुख्यमंत्री तसेच मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा संपन्न होणार आहे. आषाढी यात्रा कालावधी दि.१५ ते २९ जुलै असा असून, या कालावधीत श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराशी संबंधित प्रथा, परंपरा व भाविकांना देण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
दि.१६ जुलै रोजी श्रींचा पलंग काढून भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
मंदिर समितीची सभा दि.२६ मे रोजी  भक्तनिवास येथे श्री. औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन करून ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक प्रविणकुमार घम, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे विलास वाहणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, जतन-संवर्धन कामाचे ठेकेदार प्रतिनिधी तसेच मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
सभेमध्ये आषाढी यात्रा नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यामध्ये शासकीय महापूजा, २४ तास दर्शन व्यवस्था, दर्शनरांग नियोजन, लाईव्ह दर्शन, सुरक्षा व्यवस्था, निवास व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी, अन्नछत्र तसेच इतर अनुषंगिक सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच प्रतिवर्षीप्रमाणे “श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार” देण्याचे निश्चित करण्यात आले. जतन व संवर्धन कामांच्या आढाव्यामध्ये श्री महालक्ष्मी मंदिर व श्री व्यंकटेश मंदिर येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून माहे जुलैमध्ये भाविकांसाठी मंदिरे दर्शनास खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंदिराचे मूळ स्वरूप कायम राखण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचेही ठरविण्यात आले.
सभेत मंदिर समितीच्या सन २०२६- २०२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या “जगद्गुरू अभंग गाथावन” व “श्री ज्ञानेश्वरी तपोवन” या अभियानांमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचा सहभाग नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मंदिर समितीच्या जमिनी जास्तीत जास्त ३ ते५ वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्याबाबत अधिनियमामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे ठरले.
याशिवाय भक्तनिवास येथील ५ बेड व ८ बेडच्या खोल्या वातानुकूलित करणे, २४ तास गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी हिट पंप यंत्रणेचे अद्यावतीकरण करणे, तसेच पंढरपूर शहर व परिसरातील अधिकृत मठांमध्ये शौचालय बांधकाम करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
Post Views: 8
Previous Post

तिऱ्हे गावातील सीना नदीमध्ये बुडून शेतमजुराचा मृत्यू

Next Post

१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

१७ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल

ताज्या बातम्या

अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

अधिक मासानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर

May 27, 2026
जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

जगाच्या अस्तित्वासाठी शिव आणि शक्तीचा संगम अत्यावश्यक

May 27, 2026

सीईओंना थेट व्हॉट्सअॅप करा; तक्रारींवर आता ‘ऑनलाइन’ कारवाई”

May 27, 2026
घोषाच्या गजरात सोलापुरात संघ शक्तिचा आविष्कार

घोषाच्या गजरात सोलापुरात संघ शक्तिचा आविष्कार

May 27, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त  महामंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन 

May 27, 2026
डॉ. अभय उत्पात यांच्या पर्यावरण पूरक पेटन्टला केंद्र सरकारची मान्यता

डॉ. अभय उत्पात यांच्या पर्यावरण पूरक पेटन्टला केंद्र सरकारची मान्यता

May 27, 2026
जुनीपेठ पोलीस चौकी परिसरात घराला आग

जुनीपेठ पोलीस चौकी परिसरात घराला आग

May 27, 2026
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी शिवप्रेमी युवकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी शिवप्रेमी युवकांचे ग्रामपंचायतीला निवेदन

May 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0881234

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697