बार्शी – आयटक कामगार केंद्र व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज पेट्रोल, डिझेल स्वयंपाकाचा गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधामध्ये तीव्र निदर्शने आंदोलन तहसील कार्यालय बार्शी येथे करण्यात आले. त्यासोबतच शेतकरी व कामगारांच्या मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. हे अंदोलन कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे व आयटक जिल्हा सचिव कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व भाजप नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी करुन परिसर आंदोलकांनी दणानून सोडला.
आंदोलनाचे निवेदन नायब तहसिलदार यांनी स्वीकारले. निवेदनामध्ये पेट्रोल, डिझेल, स्वयंपाका गॅस , खाद्यतेल, डाळी, जीवनावश्यक वस्तू यांचे भाव तातडीने कमी करा, शेतीमालाला हमीभाव, खते, बी बियाने अनुदानासह अल्प दरात उपलब्ध करा, खत बी बियाणे यांची साठेबाजी करणारांवर कारवाई करा, कर्जमाफी करा , हॉस्पिटल कर्मचारी, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचार, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, बार्शी नगरपालिका कंत्राटी कर्मचारी यांना तीस हजार रुपये किमान वेतन करा, सर्वांना पेन्शन द्या, कामगार कायद्याची मोडतोड थांबवा, शक्तिपीठ महामार्ग कुंभमेळा यावरील खर्च थांबवा, नीट परीक्षेमधील पेपर फुट करणाऱ्यांवर कारवाई करा, शिक्षणाचा बाजार थांबवा, शेतकरी विद्यार्थी आत्महत्या थांबवा, बेरोजगारांना हाताला काम द्या, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा, छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा, आमदार खासदारांच्या पेन्शन बंद करा या मागण्या करण्यात आल्या.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉ. डॉ. प्रवीण मस्तुद, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉ. सतीश गायकवाड, अखिल भारतीय किसान सभेचे लहू,आगलावे, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे आनंद गुरव, भारत भोसले , भारती मस्तुद , संपत खताळ , निर्मला सरवदे, बिभीषण हुरकुडे, बांधकाम कामगार संघटनेचे कॉ. अनिरुद्ध नखाते, बालाजी शितोळे, भारत चव्हाण, नानासाहेब ठाकरे, परशुराम यादव, विनोद गायकवाड, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर संघटनेचे प्रमिला शिंदे, सुवर्णा नेंदाने, शितल करडे, सविता नागटिळक, तोळाबाई ओव्हाळ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे सुनील भोसले, भारत लोखंडे, दुर्गा गवळी, अनुराधा मंडलिक, बार्शी नगरपालिका कंत्राटी कामगार संघटनेचे विजय ढवारे, केशव गायकवाड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 9