पंढरपूर – पंढरपूर नगरपालिकेच्या इमारतीमध्ये असलेले मुख्याधिकारी व नगराध्यक्ष केबिन मधल्या वापरण्यातयेणाऱ्या टॉयलेटचे मैला मिश्रित पाणी नगरपालिकेच्या लगत असणाऱ्या बुरुड गल्लीतील रहिवाशांच्या घरात जात असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हेच मैला मिश्रित पाणी नगरपालिकेने त्वरित बंद न केल्यास चक्क मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये आणून टाकण्याचा इशारा विक्रम शिरसट यांनी दिलाआहे.
मुख्याधिकारी व नगराध्यक्षाच्या केबिनमधील मैला मिश्रित पाणी नगरपालिके लगत असलेल्या बुरुड गल्लीतील रहिवाशांच्या घरातजात आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे, नगरपालिकेचे अधिकारी व नगराध्यक्षांच्या ही बाब लक्षात आणून दिली असता याकडे चक्क कानाडोळा केला जात आहे. त्यामुळे पालिकेकडून त्वरित हे मैलामिश्रित पाणी बंद करावे ,अन्यथा हेच पाणी नगरपालिकेतील मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षाच्या केबिनमध्ये आणून टाकण्याचा इशारा माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसट यांनी दिलाआहे.
Post Views: 14