
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोषकुमार घोडके, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे राज्यचिटणीस विश्वास गजभार, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे आदी उपस्थित होते.





















