
सोलापूर – जि प शाळा अंत्रोळी येथे 21 मे पासून सुरू असलेल्या शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूर यांच्या उन्हाळी खोखो प्रशिक्षण शिबिराचा निरोप समारंभ संपन्न झाला.
किशोर व किशोरी गटातील खेळाडूंसाठी खास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन प्रशिक्षक सदानंद गुजले यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.
याचा समारोप शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे व दैनिक तरुण भारतचे वृत्तसंपादक अजितकुमार संगवे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी शाहू स्पोर्ट्सचे सचिव श्रीरंग बनसोडे, खजिनदार नागनाथ म्हमाने, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे, पालक सलीम शेख, शशिकांत कोळी, अंत्रोळी गावचे समस्त पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी भरपूर सराव करून खेळामध्ये सातत्य ठेवावे व अंत्रोळी गावातून राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाडूंनी नेत्र दीपक कामगिरी करून आपल्या गावचे नाव लौकिक करावे असे कार्यक्रमाचे श्री. ढेपे म्हणाले. याप्रसंगी राज्यस्तरीय खेळाडू गौरी शिंगण व या उन्हाळी प्रशिक्षण वर्गाचे प्रशिक्षक सदानंद गुजले यांचा सत्कार करण्यात आला.
Post Views: 5