
सांगोला – देशाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आर.पी.आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवार दि.३० मे रोजी जवळा (ता.सांगोला) येथील शारदाई आध्यात्मिक नागरी येथे स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील आणि हभप.स्व.शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या स्मृतीला अभिवादन केले. यावेळी माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह आर.पी.आयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, तालुका अध्यक्ष खंडूतात्या सातपुते आदीसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. रामदास आठवले यांनी संपूर्ण स्मृतीस्थळाची पाहणी करताना स्व.आ.काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यासाठी दिलेले योगदान जाणून घेतले.