सोलापूर : राज्यस्तरीय वयोगट डायव्हिंग स्पर्धेत 14 17 व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सोलापूरच्या खेळाडूंनी चार सुवर्ण, सहा रौप्य व पाच कांस्य पदक घेऊन सोलापूरला वर्चस्व मिळवून दिले आहे .
सोलापूर जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने अशोक चौक येथील श्री मार्कंडेय जलतरण तलावावर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते झाले . यावेळी मुख्य सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मयूर व्यास, सोलापूर महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी नजीर शेख, सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, सचिव संतोष कोल्हापुरे, विजय गुल्लापल्ली, अनिल यरगल, किरण कोल्हापूर, प्रशिक्षक मनीष भावसार, शिक्षक श्रीकांत शेटे, रेल्वेचे प्रशिक्षक हरीष अन्नदास, जलतरणचे प्रशिक्षक श्रीकांत दोरनाल उपस्थित होते.
कोल्हापूरच्या संघाने तीन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य पदक मिळवून दुसऱ्या स्थानावर तर मुंबई संघाने दोन सुवर्ण, एक रौप्य व तीन कांस्य पदक मिळवून तिसऱ्या क्रमांकावर वाटचाल सुरू आहे
नाव : अंतिम निकाल : (सुवर्ण, रौप्य, कांस्य ) :
14 वर्षाखालील : हायबोर्ड : मुली ( नाव, कंसात मिळवलेले गुण) :
मनस्वी सावंत (१६५.९५, गुण, सोलापूर ), कनक
शंकु : (१५७.९५, सोलापूर),
उज्वला सोमा ( 134.15, सोलापूर), मुले : संभाव चेचर (२१४.३५ , कोल्हापूर), शौर्य पाटील (१९८.३५, कोल्हापूर), अंश तिलोतिया (180.40,सोलापूर ) —
17 वर्षाखालील मुले : तीन मीटर स्प्रिंग बोर्ड :
नील पाटील (296.25,कोल्हापूर), रणवीर खाडे (246.45, सोलापूर), वेदांत चिल्वेरी (२२०.३०, सोलापूर), मुली : मनस्वी माने (२५६.६०, सोलापूर), गीतिका सालियन (१९१.९०, मुंबई), निशिता ठाकूर (१७०.२५, मुंबई),
१९ वर्षाखालील मुले : हायबोर्ड :स्वराज लाड ( (३६९.७०, मुंबई), संकेत लिगडे, 295.85, सोलापूर ),
श्रीयश सपकाळ (२८२.६०), मुली : श्रावणी सूर्यवंशी (३०४.४०, सोलापूर), वंशिका चुंगीवाडीयार (१९८.६०), हर्षदा गोली (१९०.५५, सोलापूर)
14 वर्षाखालील : मुले : एक मीटर स्प्रिंग बोर्ड :
मीत वलन्त्र (२१०.२०, मुंबई), संभाव चेचर (196.50, कोल्हापूर ), शौर्या पाटील (१८०.९०, कोल्हापूर), मुली : कनक शंकू (१५८.४०, सोलापूर), मनस्वि माने (१३७.८५), भार्गवी हळुंडे ( 130.35, मुंबई), १७ वर्षाखालील मुले : हायबोर्ड : नील पाटील (254.30, कोल्हापूर), रणवीर खाडे (239.80, सोलापूर), अथर्व माळी ( 169.30,
Post Views: 8