पंढरपूर – केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालया मार्फत घेण्यात आलेल्या ‘गेट’ अर्थात ‘ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग’ या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.अत्यंत अवघड समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत स्वेरी महाविद्यालया मधील तब्बल १७ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळविले आहे. या परीक्षेमध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली असून देशपातळीवर सर्वोच्च रॅंक ६४९ मिळवली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ओम राजू पाटील, सोहम चेतन कुलकर्णी, अनुष्का शहाजी घोडके, आदेश बाळासाहेब कोंढारे, वैष्णवी विलास मस्के, विवेक बंडू पवार, ओंकार बापुसो देशमुख, समर्थ महेश मोटे, आकाश नवनाथ चव्हाण, जय बाळासाहेब जाधवर, तुषार शंकर कर्डुले, भाग्यवान सुनील सायकर, संकेत रावसाहेब मोरे, श्रेयश दशरथ लोकरे, रणजीत कमलाकर धनवडे, आदेश दत्तात्रय देठे व रोहन राजेश ताटीपामल या १७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील कांही विद्यार्थ्यांनी दोन स्वतंत्र पेपर देऊन अधिक यश मिळवले आहे.
स्वेरीच्या वतीने घेण्यात येतअसलेल्या सातत्यपूर्ण सराव सत्रांमुळे आणि उच्चशिक्षित प्राध्यापकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कठीण परिश्रमाला अभूतपूर्व यश मिळाले आहे.
संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले,
उपाध्यक्षसुरेश राऊत, सचिव डॉ. सुरज रोंगे, संस्थेचे इतर पदाधिकारी व विश्वस्त, सर्व संचालकमंडळ, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.एस.व्ही.मांडवे, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार, इतर अधिष्ठाता, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वपालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
————–
चौकट : ( नाईट स्टडी, गेस्ट लेक्चर्समुळे शक्य )
प्रथम वर्षापासून घेतलेल्या नाईटस्ट
डी व आयोजित केलेले गेस्ट लेक्चर्स यांचा गेट परीक्षेत यशस्वी होण्यासाठी खूप फायदा झाल्याचे यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितले.
Post Views: 16