पंढरपूर – विठ्ठल मंदिरातील अंतर्गत दर्शन बारीचे काम पूर्णझाले आहे. भाविकांना ऊन, वारा, पाऊस यापासून त्रास होऊ नये यासाठी प्रथमच दर्शन बारीच्याछतासाठी पाँलीकार्बोनेट सीटचा वापर करण्यात आला आहे. या अत्याधुनिक पारदर्शक छतामुळे भाविकांना मंदिरावरील कळसाचे दर्शन देखील घेता येणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या दर्शन बारीमुळे भाविकांचे दर्शन अधिक सुलभ झाले आहे.
येथील विठ्ठल मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरु आहे. मंदिरातील जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे डिंसेबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर कामाला वेग आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सूचनेनुसार मंदिरातील हत्ती दरवाजा ते रुक्मिणी मंदिर पर्यंत नव्याने दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. नव्या दर्शन रांगेमुळे भाविकांचा त्रास कमी झाला आहे तसेच उन,पावसा पासून संरक्षण झाले आहे.
येथील दर्शन बारीसाठी प्रथमच पाँली कार्बोनेटसीटचा वापर करण्यात आला आहे. ३५ फूट लांब आणि ३ फूट रुंद अशी दर्शन रांग तयार करण्यात आली आहे. अत्याधुनिक आणि आकर्षक पध्दतीने तयार करण्यात आलेली दर्शन रांगेवरील छत हे पूर्णपणे पारदर्शक आहे. रांगेतून भाविकांना मंदिरावरील कळस दर्शन व्हावे अशी यामध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांमधून या नव्यासुविधेमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
————
कोट-
विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेसाठी पाँली कार्बोनेट सीटचा वापर करण्यात आला आहे.अत्याधुनिक साधनांचा वापर केल्यामुळे भाविकांना दर्शनरांगेतून मंदिरावरील कळसाचे दर्शन घेता येत आहे. शिवाय दर्शन रांग सुलभ व जलद होण्यास मदत झाली आहे. उन,वारा पाऊस यापासून भाविकांचे संरक्षण देखील होणार आहे.
प्रवीणकुमार घम ( व्यवस्थापक, विठ्ठल मंदिर, पंढरपूर )
Post Views: 25