Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

युवकास पेट्रोल टाकुन पेटवून देवून जीवे ठार मारल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in crime
0
युवकास पेट्रोल टाकुन पेटवून देवून जीवे ठार मारल्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – दि. १ ऑक्टोबर २०१७ रोजी दुपारी १.४५ वा.चे सुमारास भालेकर पाटीजवळ देवगांव येथे फिर्यादी त्याचे मित्र अमजद मुलाणी, भिका मांजरे व आरोपी वसंत बाबू मांजरे रा. देवगांव, ता. बार्शी हे सर्व गप्पा मारत बसले असताना आरोपी तेथून निघून गेला व थोड्या वेळाने परत येऊन आरोपीने पाण्याच्या रिकाम्या बाटलीत पेट्रोल घेवून येऊन मागील भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादीच्या डोक्यावर बाटलीतील पेट्रोल ओतून काडीपेटीची काडी ओढून अंगावर टाकून पेटवून दिले. त्यावेळी फिर्यादीस त्याचे मित्रानी उपचारासाठी बकरे हॉस्पीटल बार्शी येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान यातील फिर्यादी धर्मराज विठठल मांजरे, वय ३० वर्षे हा दि. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी मयत झाला. यातील आरोपीविरुध्द पांगरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं.२५०/२०१७ नुसार भादंवि. कलम ३०७, ३०२, ३२४ अन्वये दि. ५ ऑक्टोबर २०१७ रोजी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी वसंत बाबु मांजरे हा गुन्हा घडलेपासून सुमारे ४ वर्षे फरार होता. गोपनीय बातमीदारामार्फत माहिती घेवन सदर आरोपीस लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील पाडळी, ता. खंडाळा, जि. सातारा येथून आरोपीस अटक करुन सबळ पुरावा गोळा करुन आरोपीविरुध्द सदर गुन्हयाचा प्रथम तपास सपोनि. डी. एस. ढोणे, पो.उपनिरीक्षक संतोष बडे यांनी करुन उर्वरीत तपास पो.उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकार पक्षाच्यावतीने सदर गुन्हा शाबितीसाठी १६ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादीने मृत्यपूर्व दिलेला जबाब व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे कोर्टासमोर झालेले जबाब व घटना एकमेकास पूरक होत्या. त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. तपास अधिकारी यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे व नेत्र साक्षीदार यांचे जबाबाच्या अनुषंगाने मे. कोर्टासमोर आलेला पुरावा या सर्व बाबी सहा.सरकारी वकील ॲड. आनंद गोरे यांनी मे. कोर्टासमोर मांडला. कोर्ट पैरवी पोकॉ. १५०५ प्रभाकर गायकवाड यांनी साक्षीदार यांना कोर्टासमोर हजर ठेवून योग्य साक्ष देण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले.
सरकार पक्षाचेवतीने युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीने फिर्यादीचे अंगावर पेट्रोल ओतून पेटवून जिवे ठार मारले. सदर बाब सरकार पक्षाचे युक्तीवादामध्ये निदर्शनास आणून देण्यात आली व सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहाय्यक म्हणून मा. ना. सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले.
सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. मलकालप‌ट्टे रेड्डी मॅडम यांनी आरोपी यास भादंविक ३०२ अन्वये दोषी धरुन जन्मठेप व ५,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद गोरे व ॲड. शिवाजी होटकर यांनी काम पाहिले.
सदर केसमध्ये अंजना कृष्णा व्ही. एस., सहा. पोलीस अधीक्षक, अति. कार्यभार बार्शी उपविभाग व साईनाथ सुरवसे, सहा. पोलीस निरीक्षक यांनी साक्षीदार यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. सदर गुन्हयाचा तपास सपोनि. डी.एस. ढोणे, पो.उपनिरीक्षक  संतोष बडे, पो.उपनिरीक्षक अमोल ननवरे यांनी केलेला होता. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोकॉ. १५०५ प्रभाकर गायकवाड यांनी काम पाहिले.
Post Views: 7
Previous Post

मॉडेल क्रिकेट ॲकॅडमी, ख्वाजा बंदेनवाज क्लबचे शानदार विजय

Next Post

निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश”

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

निर्भया पथकाला बालविवाह रोखण्यात यश"

ताज्या बातम्या

विवाहितेस माहेरी दिले हाकलून; वाचमेनला अज्ञातांकडून मारहाण

June 3, 2026

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

June 3, 2026
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

June 3, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

June 3, 2026

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १२ जुनला पेन्शन अदालत 

June 3, 2026

राजा भाऊंच्या तिकिटासाठी झेडपी अध्यक्षांची मुंबईवारी 

June 3, 2026

रुग्ण महिलेचे दागिने लंपास; बांबू व लाथा बुक्क्यांनी मारहाण

June 3, 2026
द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ

द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0891394

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697