Wednesday, June 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ

तरुण भारतbyतरुण भारत
June 3, 2026
in solapur
0
द.सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतींच्या जात प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह; पडताळणी समितीच्या निर्णयाने खळबळ
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा सोमनाथ पटणे (उर्फ वर्षा शिवाजी कोनाळे) यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण घडामोड समोर आल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. धाराशिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने त्यांच्या ओबीसी प्रवर्गातील जात प्रमाणपत्राची पडताळणी करत ते अवैध असल्याचा निष्कर्ष नोंदवल्याची माहिती पुढे आली असून, संबंधित प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याबाबत कारवाईचे निर्देश दिल्याची चर्चा सुरू आहे.
             प्राप्त माहितीनुसार, होटगी स्टेशन परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद मुळे यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरणाची सखोल चौकशी हाती घेतली. निवडणूक अर्जासोबत वर्षा शिवाजी कोनाळे यांनी राज्य शासनाच्या इतर मागासवर्गीय (ओबीसी) यादीतील अनुक्रमांक १९० वरील ‘वाणी’ जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. संबंधित प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी समितीने विविध शासकीय अभिलेख, नोंदी आणि कागदपत्रांची पडताळणी केली.
         या प्रकरणात समितीने दोन वेळा सुनावणी निश्चित केल्याचे समजते. मात्र, दोन्ही वेळा संबंधितांकडून उपस्थिती राहिली नसल्याची नोंद समितीसमोर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पुरावे आणि शासकीय नोंदींच्या आधारे समितीने पुढील कार्यवाही सुरू ठेवली. तपासादरम्यान प्रमाणपत्रावरील डिजिटल स्वाक्षरी, कार्यालयीन शिक्का आणि इतर तांत्रिक बाबींची बारकाईने छाननी करण्यात आली. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र त्यांच्या कार्यालयातून निर्गमित झाले नसल्याचे लेखी स्वरूपात कळविल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रमाणपत्रावरील बारकोडची पडताळणी केल्यानंतर त्यासंबंधित माहिती उपलब्ध होत नसल्याचेही निदर्शनास आल्याचे सूत्रांनी सांगितले.
            दरम्यान, बोरामणी पंचायत समिती गणातून झालेल्या निवडणुकीत वर्षा पटणे यांनी २ हजार १४३ मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. त्यांना ६ हजार ३०७ मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्धी उमेदवारांना ४ हजार १६४ मते मिळाली होती. या विजयानंतर त्यांची दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली होती. आता जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयानंतर त्यांच्या पदावर, सदस्यत्वावर तसेच पुढील प्रशासकीय प्रक्रियेवर काय परिणाम होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणातील अधिकृत आदेश आणि संबंधित यंत्रणांकडून होणाऱ्या पुढील कारवाईकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 11
Previous Post

शेतकऱ्यांवर वीजपुरवठ्याबाबत अन्याय; लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज

Next Post

रुग्ण महिलेचे दागिने लंपास; बांबू व लाथा बुक्क्यांनी मारहाण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रुग्ण महिलेचे दागिने लंपास; बांबू व लाथा बुक्क्यांनी मारहाण

ताज्या बातम्या

अखेर गोपाळगड झाला मोकळा #marathinews #news

June 3, 2026

नागेश भोसलेंची सही बनावट काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद

June 3, 2026

विवाहितेस माहेरी दिले हाकलून; वाचमेनला अज्ञातांकडून मारहाण

June 3, 2026

ऐन उन्हाळ्यात पालेभाज्यांचे दर कडाडले

June 3, 2026
५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा; सोलापूर, सांगली, पुणे, धाराशिवची दोन्ही गटात दणक्यात सुरुवात

June 3, 2026
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

June 3, 2026

टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी १२ जुनला पेन्शन अदालत 

June 3, 2026

राजा भाऊंच्या तिकिटासाठी झेडपी अध्यक्षांची मुंबईवारी 

June 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0891511

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697