पिलीव – परीसरात खरेतर आसपासच्या खेडेगावातुन पिलीवच्या मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या व इतर अनेक फळे याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते.मोठ्या प्रमाणावर व्यापारी येत असल्यामुळे भाजीपाल्याचे दर फारसे नव्हते पण सध्या ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्याची कमतरता असल्यामुळे भाजीपाल्याचे दर अक्षरश गगनाला भिडले आहेत.तर काही पालेभाज्या बाजारातून सध्या गायबच झाल्या आहेत. सध्या मेथी, शेपु, चुका, पालक, कोथिंबीर, या पालेभाज्याची उन्हाळ्यात आवकच कमी झाल्यामुळे दहा रुपयाला मिळणाऱ्या पेंडीचा दर विस ते पंचवीस रुपयांपर्यंत पोहचला आहे.तर कोथिंबीरीचा भेळा तिस ते चाळीस रुपये टाॅमॅटो 80 रुपये किलो, वांगी 80 रुपये किलो हिरवी मिरची 80 ते 100 रुपये किलो, गवार 80 रुपये किलो ,बटाटा 40 रुपये किलो, कांदे 20 ते 30 रुपये किलो असे पालेभाज्या व इतर भाज्यांचे दर कडाडले आहेत.यामुळे गृहीणीचे आर्थिक बजेट चांगलेच बिघडले आहे.ऐन उन्हाळ्यात दरवाढीचा सामना करावा लागत आहे .आता चांगला पाऊस झाल्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी पालेभाज्या व इतर भाज्यांचे उत्पादन आल्याशिवाय दर कमी होणार नाही .साधारणत जुलै महिन्याच्या अखेरीस भाजीपाल्याचे दर स्थिर होतील तोपर्यंत दरवाढीचा सामना करावा लागणार आहे.गृहीणींना गॅस दरवाढ, किराणा मालाची, खाद्यतेल दरवाढीबरोबरच पालेभाज्या व इतर भाज्यांच्या दरवाढीचा सामना करावा लागत आहे.यामुळे सर्व सामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.