सोलापूर – आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील आणि यात्रेशी संबंधित विविध सोयी-सुविधांच्या कामांना आता गती मिळणार आहे. यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कामांसाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियेसाठीही निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या बैठकीनंतर बोलताना जैन यांनी सांगितले की, पालखी मार्गावरील भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असलेली पायाभूत कामे, स्वच्छता व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तात्पुरती निवास व्यवस्था तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी मंजूर निधीचा वापर करण्यात येणार आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे काही कामांवर अनिश्चितता निर्माण झाली होती. मात्र, आवश्यक टेंडर प्रक्रिया राबविण्यास आणि त्यास मंजुरी देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने प्रशासनाने तयारीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.
Post Views: 22