Saturday, July 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील – नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील – नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  सोलापूर येथे 22 जुलै 2023 ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी म्हणून काम केले. जवळपास या तीन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे हाताळण्यात आली. येथील नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्यातून हाती घेतलेली जवळपास सर्व कामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांनी जे प्रेम व सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे खूप आभारी आहे. तसेच 3 एप्रिल 2026 रोजी माझी बदली नागपूर येथे झाली असली तरी सोलापूर जिल्हा कायमस्वरूपी माझ्या मनात आहे व राहील, असे भावनिक उद्गार तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या प्रसंगी काढले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे बदली झाल्या निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम नियोजन भवन येथील सभागृहात त आयोजित करण्यात आलेला होता, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी सर्वश्री संतोषकुमार देशमुख, सुशांत बनसोडे, सुमित शिंदे, सदाशिव पडदुने, विजया पांगारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, अन्य धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व अधिकार कर्मचारी तसेच प्रशासनातील अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्हाधिकारी पदाची यशस्वी कारकीर्द ही येथील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामावर अवलंबून असते. नव्याने रुजू झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन महिन्यातच कोणत्या अधिकाऱ्याकडून कोणत्या प्रकारची
कामे करून घेता येतील याची माहिती होणे गरजेचे असते. तसेच वेळप्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गरजेप्रमाणे त्यांना रजाही देणे आवश्यक असते. परंतु जिल्हाधिकारी यांनी कठोर असणे आवश्यक आहे. कारण जिल्हाधिकारी कठोर राहिले तर प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी अधिक गतीने कामे करतात व त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला लवकर मिळण्यात होऊन शासन व प्रशासनाची चांगली प्रतिमा तयार होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
महसूल प्रशासनाबरोबरच इतर विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट सहकार्यामुळेच आपण सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न, कामे मार्गी लावण्यात यशस्वी झालो असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगून पंढरपूर कॉरिडॉर, सोलापूर येथील विमान सेवा सुरू करणे, आषाढी वारीचे यशस्वी आयोजन, पूर परिस्थितीत सर्व प्रशासकीय यंत्रणेने केलेले कामकाज तसेच प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न, यामुळे येथे आपण काहीतरी सर्वसामान्यांसाठी काम करू शकलो याचे समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूर येथे बदली झाली असली तरी सोलापूर जिल्ह्याच्या कोणत्याही प्रकारच्या कामासाठी आपण सांगितले तर ते काम करण्यासाठी तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सूचित केले.
जिल्हाधिकारी एस कार्तिकेयान  यावेळी म्हणाले की, मागील दोन महिन्यापासून जिल्हाधिकारी म्हणून आपण सोलापूर मध्ये काम करत असून तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येथे जी प्रशासकीय कामकाजाची चौकट निर्माण केली आहे, त्यामुळे कामे करताना कोणतीही अडचण येत नाही. येथील सर्व अधिकारी कर्मचारी दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पडतात. तसेच श्री आशीर्वाद सरांनी जे आपले अनुभव मला सांगितलेले आहेत त्या पद्धतीने कामकाज करून सोलापूर जिल्हा विविध विकासकामात अग्रेसर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी की कुशल जैन यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या कामाचे व कार्यपद्धतीचे कौतुक केले.

सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय कारभारात तीन वर्षे कुशल नेतृत्व व मार्गदर्शन देणारे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा निरोप समारंभ सोमवारी सायंकाळी पार पडला. या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्यकाळाचा आढावा घेतला. यामध्ये  तहसीलदार मदन जाधव यांनी प्रशासकीय अनुभव शेअर करत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे कामकाज सुलभ झाल्याचे सांगितले.निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रास्ताविक करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या निर्णयक्षमतेची प्रशंसा केली.जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. महत्वाच्या निर्णयांची माहिती देत त्यांनी कुशल नेतृत्व अधोरेखित केले.उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर व उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख यांनीही मनोगत व्यक्त करून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. महसूल संघटनेचे पदाधिकारी शंतनू गायकवाड रविराज नसते यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. तसेच सर्व संघटनाचे पदाधिकारी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना दिलेले प्रोत्साहन. समारंभात उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तर तहसील चे तहसीलदार निलेश पाटील यांनी केले तर आभार अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील महसूल विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post Views: 59
Previous Post

यू डायसच्या पटसंख्येनुसार पुस्तके दाखल !

Next Post

दूध, गुटखा, बनावट औषधांवर प्रशासनाचा प्रहार; भेसळखोरांमध्ये एकच खळबळ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

दूध, गुटखा, बनावट औषधांवर प्रशासनाचा प्रहार; भेसळखोरांमध्ये एकच खळबळ

ताज्या बातम्या

दैनिक तरुण भारत डिजिटल आणि न्यूज चॅनलच्या दिंडी स्पर्धेत सोलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद

दैनिक तरुण भारत डिजिटल आणि न्यूज चॅनलच्या दिंडी स्पर्धेत सोलापूरकरांचा भरभरून प्रतिसाद

July 25, 2026
महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र विद्यालयाच्या फुटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

July 25, 2026

परंपरे प्रमाणे विठ्ठल, राहि आणि रखुमाईची नगरप्रदक्षिणा रस्त्यावरुन काढण्यात आली रथयात्रा

July 25, 2026
नाना-भैय्या युवा मंचाकडून वारकऱ्यांसाठी साडेतीन टन खिचडीचे अन्नदान

नाना-भैय्या युवा मंचाकडून वारकऱ्यांसाठी साडेतीन टन खिचडीचे अन्नदान

July 25, 2026

पिलीव परीसरात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत, यंदाच्या बेंदुर सणावर दुष्काळाचे सावट

July 25, 2026

मंगळवेढा  शहर व ग्रामीणमध्ये ड्राय डे दिवशी दारू फोफावते 

July 25, 2026

बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यावर छापा, २८ हजार  रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त

July 25, 2026

९ वर्षीय बालकाच्या संशयित रेबीज मृत्यूने खळबळ; कुत्रा चावला की जखम चाटली ? संभ्रम कायम

July 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0998322

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!