Tuesday, June 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दूध, गुटखा, बनावट औषधांवर प्रशासनाचा प्रहार; भेसळखोरांमध्ये एकच खळबळ

तरुण भारतbyतरुण भारत
June 9, 2026
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अवघ्या आठ दिवसांत राज्यभर धडक कारवायांची मालिका राबवत भेसळ आणि बेकायदा अन्नव्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे भेसळमाफियांमध्ये खळबळ उडाली असून, नागरिकांमधून या मोहिमेचे स्वागत होत आहे.
           राज्यातील गुटखा व पानमसाला विक्री, भेसळयुक्त दूध व तूप, रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेली फळे, अस्वच्छ खाद्य उत्पादन केंद्रे, बनावट औषधनिर्मिती तसेच दिशाभूल करणाऱ्या औषध जाहिरातींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारवाईदरम्यान ३३ जणांना अटक करण्यात आली असून २७ आस्थापनांवर सीलची कारवाई करण्यात आली आहे. तसेच २५ गुन्हे दाखल करून कोट्यवधी रुपयांचा संशयित व भेसळयुक्त माल जप्त करण्यात आला आहे.
            सोलापूर विभागानेही दूध भेसळीविरोधातील मोहिमेला गती दिली आहे. जिल्ह्यातील अनेक दूध उत्पादक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत १३ दुधाचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. या कारवायांमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासन गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. विशेषतः दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत वाढलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात आहे. भेसळ रोखण्यासाठी केवळ छापेच नव्हे, तर सातत्यपूर्ण तपासणी, प्रयोगशाळा विश्लेषण आणि दोषींवर कठोर कारवाई ही त्रिसूत्री प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
          दरम्यान, अल्पावधीत झालेल्या मोठ्या कारवायांमुळे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत जनतेत चर्चा रंगली आहे. ग्राहक संरक्षणाशी संबंधित संघटनांनीही भेसळविरोधातील मोहिमेचे स्वागत करत अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण कारवायांची अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यात सुरक्षित अन्नपदार्थ आणि निर्भेळ दूध पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सुरू झालेली ही मोहीम भविष्यात आणखी व्यापक स्वरूप धारण करणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून दिले जात आहेत.
Post Views: 15
Previous Post

सोलापूर येथून माझी बदली झाली, परंतु सोलापूर हे माझ्या मनात कायमस्वरूपी राहील – नागपूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

Next Post

निर्भेळ दूध, सुरक्षित ग्राहक आणि योग्य दर !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

निर्भेळ दूध, सुरक्षित ग्राहक आणि योग्य दर !

ताज्या बातम्या

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

June 9, 2026
राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने करमाळ्याचे प्रा.बाळकृष्ण लावंड सन्मानित

June 9, 2026
शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

शेतात सर्पदंश – औज आहेरवाडी येथील शाळकरी मुलीचा  मृत्यू

June 9, 2026

मोडनिंब येथे सातत्याने बत्तीगुल; नागरिक त्रस्त

June 9, 2026

मित्राच्या मृत्यूस कारणीभूत – दुचाकी स्वार मित्रावर गुन्हा दाखल

June 9, 2026

नंदोइला व्यवसायासाठी माहेरून ३ लाख आण म्हणून  छळ – पतीसह ६ जणांवर गुन्हा दाखल

June 9, 2026

सीताफळाचे झाड का तोडले म्हणून वृद्ध महिलेस लाकडाने मारहाण 

June 9, 2026

काशी जगद्गुरूंचे धर्मसभा सांगता समारंभ सोलापूरात

June 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0901210

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697