धाराशिव – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश राजेनिंबाळकर यांचा पदग्रहण सोहळा धाराशिव शहरातील काँग्रेस भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाभरातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा दिमाखात संपन्न झाला.
पदग्रहण सोहळ्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नानासाहेब पाटील, माधव कुतवळ, प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार, विश्वास शिंदे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, प्रदेश सचिव डॉ. नवगिरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अभिजित चव्हाण, शिला उंबरे, प्रदेश सचिव डॉ. स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार, राजाभाऊ शेरखाने, मधुकर बिद्री, प्रशांत पाटील, खलील सय्यद, नानाभाऊ भोसले, महेबूब पटेल, विनोद वीर, विलास शाळु, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गोदावरी केंद्रे, अर्जुन बिराजदार, सर्फराज काजी, धनंजय राऊत, अग्निवेश शिंदे, शिवाजी गायकवाड, विजय वाघमारे, तोडकर, अशोक बनसोडे, गपाट, रुपेश शेंडगे, अमोल कुतवळ, बापू हरकर, सत्तार शेख, नगरसेवक अझर पठाण, बापू शेळके, ॲड. गणपती कांबळे, आयुब पठाण, अभिमान पेठे, अंकुश पेठे, मुहिब शेख, मौलाना शौकत, लक्ष्मीकांत खटके, बालाजी हूबाळे, नगरसेवक इम्रान शेख, राजुदास आडे, दत्ता तांबे, संकेत पडवळ, गणेश पवार, भूषण देशमुख, अभिषेक बागल, मोईज शेख, मोईज सय्यद, विजय दळगडे, आबेदिन कुरेशी, धीरज सोनवणे, जावेद काझी, जीवन चौगुले, दिगंबर गायकवाड, गहिनीनाथ सोनटक्के, चंद्रकांत जाधव, ॲड. सिराज मोगल, ॲड. मुशरफ सय्यद, समी काझी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी उमेश राजेनिंबाळकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. वक्त्यांनी आपल्या मनोगतात काँग्रेस पक्षाची विचारधारा, संघटनात्मक मजबुती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची गरज व्यक्त केली.
पदग्रहणानंतर बोलताना जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांनी पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाने सोबत घेऊन काँग्रेसची संघटना गावागावात अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. शेतकरी, कामगार, युवक, महिला, व्यापारी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमकपणे भूमिका मांडेल व जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात काँग्रेसला अधिक बळकटी मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























