सोलापूर – सलग १५ दिवस बाहेर राहुल
फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापूरसह राज्यात कारचोरी करणाऱ्या एका आंतरराज्य गुन्हेगारास तेलंगणा राज्यातून अटक करून एकूण ५ कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत . पोलिसांनी या चोरट्याकडून २५ लाख रुपये किमतीच्या चोरीच्या ४ कार हस्तगत केल्या आहेत.
समद मेहमूद शेख (वय ३२, रा. निझामाबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या त्या कार चोराचे नाव आहे .
दि. २० मे रोजी पहाटेच्या वेळी सुर्यभान पाटील ( रा.अवंती नगर ,सोलापूर ) यांची स्विफ्ट डिझायर कार (एम.एच. १३ डी.ई. ३०८४) चोरीला गेली होती. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांनी या गुन्ह्याचा जलद तपास करण्याच्या सूचना सहा. पोलिस निरीक्षक संजय क्षीरसागर यांना दिल्या होत्या. त्या अनुशंगाने क्षीरसागर यांच्या पथकाने तपास सुरु केला. गुन्हा घडला त्यावेळी पहाटे एक लाल रंगाची स्विफ्ट कार लांब थांबली आणि त्यातून आलेल्या आरोपींनी कार चोरल्याचे स्पष्ट झाले. ही कार उमरग्याकडे गेल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्यांनी प्रत्येक टोल नाका चुकवून आणि गाडीचा नंबर प्लेट बदलून चलाखीने कार नेल्याचे दिसून आले. तेथून पोलिसांचे पथक तेलंगणा येथील बोगन गावात पोहचले. आरोपीने त्या कारचा मूळ नंबर लावून कार नेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलिसांनी निझामाबाद येथून वरील आरोपीला ताब्यात घेतले. त्यांनी हजरत खान (रा. कुर्ला, मुंबई) याच्यासोबत मिळून कार चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोलापूर, धाराशिव, अकोला, यवतमाळ, अकोला सूरत हायवे येथून चारचाकी गाडया चोरल्याचे पाच गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून चोरीच्या तीन व चोरी करण्यासाठी वापरलेली एक अशा २५ लाख रुपये किमतीच्या चोरीच्या ४ कार हस्तगत करण्यात आल्या. कारच्या दरवाजाची काच स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने फोडून हजरत खान याच्याकडे असलेल्या डिव्हाईसच्या सहाय्याने कार सुरु करुन कारची चोरी करीत होते. दुसरा आरोपी हजरत खान याचा शोध घेण्यासाठी एक पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त प्रितम यावलकर, सहा. पोलिस आयुक्त प्रताप पोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस अमलदार भाऊ कसबे, अमोल खरटमल, रवि धेंडे, कृष्णात बडुरे, विनोद पुजारी, विनोद व्हटकर, कुमार शेळके, शशिकांत दराडे, शिवानंद भिमदे, सुर्यकांत दराडे, अतिष पाटील, विनायक जाधव, अजय चव्हाण, ज्ञानेश्वर गायकवाड, पंकज घाडगे, अयाज बागलकोटे, सौरभ पाटील, मच्छिंद्र राठोड, नितीन मोरे, दत्तात्रय कोळवले यांनी पार पाडली आहे.
Post Views: 18