Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाचनामुळे संस्कृती घडू शकते – खेडगीकर

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in solapur
0
वाचनामुळे संस्कृती घडू शकते – खेडगीकर
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या पन्नासाव्या साप्ताहिक बैठकीनिमित्त मेसॉनिक हॉल येथे “वाचन अभियान आणि आपण” या विषयावर वाचकदूत श्रीधर खेडगीकर यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा धनश्री केळकर होत्या.
खेडगीकर यांनी आपल्या व्याख्यानात वाचन संस्कृतीचे महत्त्व , प्रिसिजन वाचन अभियानाची सुरुवात, त्याची वाटचाल आणि विविध उपक्रमांची माहिती दिली. चांगले साहित्य वाचनामुळे व्यक्तिमत्त्व घडते, विचारांना चालना मिळते आणि समाजात सकारात्मक संस्कृती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
सोलापुरात प्रिसिजन बुक क्लबची स्थापना कशी झाली, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, शाळांना पुस्तक भेट, बुकमार्क स्पर्धा तसेच वसतीगृहांमध्ये सुरू असलेल्या वाचन चळवळीची माहिती त्यांनी दिली. मागील वर्षभरात वाचकदूत म्हणून दररोज एक पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी नमूद केले.
मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी होत चाललेल्या वाचन संस्कृतीला नवसंजीवनी देण्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शहरातील चौक, रुग्णालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये पुस्तकांचे कोपरे निर्माण करण्याची संकल्पनाही त्यांनी मांडली.
यावेळी अध्यक्षा धनश्री केळकर यांनी व्याख्यानाबद्दल समाधान व्यक्त करत वाचन चळवळीसाठी रोटरी क्लब ऑफ सोलापूरकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सहसचिव पार्थ दावडा यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी खेडगीकर यांनी रोटरी क्लबच्या अध्यक्ष व सचिवांना पुस्तके भेट दिली.
कार्यक्रमास ॲड. धनंजय (आबासाहेब) माने, अण्णासाहेब कोतली, डॉ. ज्योती चिडगुपकर, डॉ. नेहा जोशी, परशुराम कोकणे, सलाम शेख, राजेंद्र गांधी, भरत अय्यंगार, शिवाजी उपरे यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि प्रिसिजन वाचन अभियानाचे कार्यकर्ते विकास धांडोरे, अच्युत काटीकर, नरहरी अघोर, पोळ सर व रघुनाथ क्षीरसागर उपस्थित होते.
Post Views: 62
Previous Post

प्राध्यापक भरती केंद्रीय पद्धतीने करावी

Next Post

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

ताज्या बातम्या

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले

July 30, 2026

आसामच्या पुरात जीवावर खेळ बाबाने वाचविले तीन बाळांचे प्राण

July 30, 2026

बोलले असे की झाला नेटकर्यांचा हल्लाच

July 30, 2026

विरोधकांना चक्क शब्दाने झोडपले

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013560

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!