Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in solapur
0
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशिक्षण
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी येथील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे तसेच सर्व संबंधित तहसीलदार अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांनी प्रशिक्षणासाठी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. निवडणुकीसाठी मतदानाचे सहा केंद्र असून दोन उमेदवार आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 616 मतदार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

निवडणूक जाहीर व आचारसंहिता दिनांक 18 मे 2026 रोजी लागू होणार असून मतदान दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होईल. मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे.

मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांची यादी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरविली जाईल. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या मतदान केंद्रावर ज्या मतदारांची यादी प्राप्त झाली आहे, त्या यादीची प्रथम खात्री करून घ्यावी. नगरपंचायत व नगरपरिषद केंद्रांमध्ये मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदारांना ओळखण्यासाठी व्हिडिओ-सीईओ व संबंधित अधिकारी/प्रतिनिधी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

निवडणूक साहित्य ताब्यात घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या. दि. 17/06/2026 रोजी सकाळी 9.00 वा. नियोजन भवन सोलापूर येथे साहित्य वितरण होणार असून साहित्य वितरण केंद्रावर वेळेवर उपस्थित राहून साहित्य ताब्यात घ्यावे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सोडण्यापूर्वी तसेच मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर साहित्याची खात्री पुन्हा-पुन्हा करावी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे अहवाल द्यावा, असे सांगण्यात आले.

महत्त्वाच्या साहित्याची तपासणी मतदान केंद्राध्यक्षांनी स्वतः करून घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये मतपेटी, मतपत्रिका, जांभळ्या शाईचा स्केचपेन, हिरवे पेपर सील व अॅड्रेस टॅग, संविधानिक/असंविधानिक नमुने व लिफाफे, मतदान केंद्राध्यक्षांची दैनंदिनी/घोपणापत्र, मतदार यादीच्या चिन्हांकित प्रती, पक्क्या शाईचा पेन/शाईची बाटली, विभेदक चिन्ह असलेला रबरी शिक्का, तसेच उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी यांच्या नमुना स्वाक्षरीची प्रत यांचा समावेश असल्याचे प्रशिक्षणात नमूद करण्यात आले. सिलींग साहित्य म्हणून पितळी सिल व लाख, ढकलपट्टी, इशारा फलक यांचाही उल्लेख करण्यात आला.

मतपेटी गोदरेज कंपनीची असून ती उघडणे, सील बंद करणे यासंदर्भातील प्रशिक्षण होणार असल्याचे सांगण्यात आले. त्या मतपेटीवर अॅड्रेस टॅगवर मतदान केंद्राचे नाव, अनुक्रमांक, पत्ता व दिनांक अचूक लिहिण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.

Post Views: 52
Previous Post

वाचनामुळे संस्कृती घडू शकते – खेडगीकर

Next Post

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार

अन्यथा, वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकणार

ताज्या बातम्या

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग परिसरात काही महिलांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले

July 30, 2026

आसामच्या पुरात जीवावर खेळ बाबाने वाचविले तीन बाळांचे प्राण

July 30, 2026

बोलले असे की झाला नेटकर्यांचा हल्लाच

July 30, 2026

विरोधकांना चक्क शब्दाने झोडपले

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013605

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!