
सांगोला – यावर्षी भीषण उन्हाळा जाणवला असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विजेचा प्रश्न गंभीर झाला असून भारनियमन वाढले आहे. तालुक्यात भारनियमन वाढल्याने शेतातील पिके, फळबागा जळून जात आहेत. तसेच जनावरांचे दूध काढण्याच्या वेळी वीज नसल्याने जनावरांच्या धारा हाताने काढण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे तालुक्यातील आणि शेतकरी पशुपालक चिंतेत आहेत. आठ दिवसात तालुक्यातील भारनियमन कमी न झाल्यास महावितरणच्या कार्यालयांना टाळे ठोकून महावितरणच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात फिरकू देणार नाही असा इशारा माजी आ.दिपकआबा साळुंखे पाटील यांनी दिला. ते सांगोला तालुक्यातील वाढते भारनियमन, शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात जाणवणाऱ्या दैनंदिन समस्या याबाबत आयोजित कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष जयमाला गायकवाड, पं.स.सभापती पुनम इंगवले, तानाजी पाटील, अनिल खटकाळे, मधुकर बनसोडे, नगरसेवक गणेश बनकर, सखाराम तंडे, राम बाबर, अरुण घुले, डॉ.सुदर्शन इंगवले, दिलीप नागणे, चंद्रकांत कारंडे, विजय शिंदे, चंद्रकांत चौगुले, समीर पाटील, विजय येलपले, डॉ.राज मिसाळ, संतोष पाटील, अनिल खडतरे, सचिन लोखंडे, शिवाजी बनकर, विजय पवार यांच्यासह कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राजकारणाच्या पुढील काळात कार्यकर्त्यांच्या मनात आहे, तोच निर्णय घेतला जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. याप्रसंगी जयमाला गायकवाड, पूनम इंगवले, तानाजी पाटील, विजय शिंदे, विजय येलपले, विलास व्हनमाने, बाबासाहेब तोडकरी, भाऊसाहेब यमगर, शहाजी खरात, डॉ.अक्षय चोरमुले, तानाजी बाबर, ॲड.संपत पाटील, शिवाजी कोळेकर, शिवाजी बनकर, चंद्रकांत चौगुले, विजय पवार, अजिंक्य शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
चौकट –
स्थानिक पातळीवर सर्व अधिकार कार्यकर्त्यांना
आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपली सत्ता मिळवण्यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक समीकरण लक्षात घेऊन कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार द्यायचा आणि कोणत्या गावात कोणत्या गटासोबत आघाडी करायची याचे संपूर्ण अधिकार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना देत असल्याचे सांगत आपापसातील मतभेद विसरून खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले.
Post Views: 9