मुंबई : ‘चिनीमंडी’द्वारे आयोजित, साखर उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या ‘शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंटरनॅशनल अवॉर्ड्स (एसईआयए) २०२६’ मध्ये ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ या कंपनीने “एक्सीलेंस इन एआय फॉर शुगर इंडस्ट्री” (साखर उद्योगात एआयच्या उत्कृष्ट वापरासाठीचा) प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे.
हा पुरस्कार ‘शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात आला. गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या तांत्रिक परिवर्तनातून जाणाऱ्या साखर उद्योगाच्या केंद्रस्थानी ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे, हेच या पुरस्कारातून अधोरेखित होते.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग असलेल्या भारताच्या साखर उद्योगावर सध्या गन्याची उत्पादकता वाढवणे, मिल रिकव्हरी सुधारणे, इथेनॉल मिश्रणचे उद्दिष्ट साध्य करणे आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणे, असे बहुविध दबाव आहेत. ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ हे सर्व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी ‘एआय पायाभूत संरचना’ विकसित करत आहे; ज्यामध्ये शेतीतील माहिती, कारखान्याचे कामकाज आणि व्यावसायिक निर्णय प्रक्रिया यांना एकाच सक्षम इंटेलिजन्स लेअरशी जोडले जात आहे.
“लोकांना नेहमीच या गोष्टीची पूर्ण जाणीव नसते की साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी हे केवळ उद्योग नसून लाखो शेतकरी कुटुंबांची उपजीविका आहेत, आपल्या वाहनांचे इंधन आहेत आणि सरकार ज्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे, त्याचे ठोस उत्तर आहेत. असे असूनही, हा उद्योग आजही आपले अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या पद्धतीनुसार घेत आहे, जे केवळ अनुभव आणि हंगामाच्या शेवटी उपलब्ध होणाऱ्या त्रोटक माहितीवर आधारित असतात. मी अशा अनेक साखर कारखाना व्यवस्थापकांसोबत काम केले आहे, जे आपापल्या कामात अत्यंत हुशार आहेत, परंतु ऐन मोक्याच्या वेळी अचूक माहितीअभावी त्यांना निर्णय घेणे कठीण जाते. हीच दरी मिटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण जेव्हा तुम्ही ‘इंटेलिजन्स लेअर’ योग्य प्रकारे कार्यन्वित करता, तेव्हा केवळ कारखानाच उत्तम चालत नाही, तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो, देशाला इथेनॉलचे उद्दिष्ट गाठता येते आणि संपूर्ण उद्योगाला स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याचे साधन मिळते,” असे ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी सांगितले.
कंपनीच्या साखर आणि कृषी एआय पोर्टफोलिओमध्ये ‘स्टोमा सेंस’चा समावेश आहे, जो शेतकऱ्यांना थेट पिकांची सद्यस्थिती आणि शेतीविषयक अचूक माहिती पुरवतो. यासोबतच ‘स्टोमा इनसाइट’ (Stoma Insight) हे साखर मूल्य शृंखलेशी जोडलेल्या कृषी-औद्योगिक भागधारकांसाठी विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेला गती देणारे व्यासपीठ आहे.
या क्षेत्रातील कंपनीच्या जमिनी पातळीवरील कामगिरीमध्ये ‘ग्रुपो पेंटालियोन’ सोबतच्या भागीदारीचा समावेश आहे, ज्या अंतर्गत साखर मूल्य शृंखलेसाठी आधुनिक एआय तंत्रज्ञान तैनात केले जात आहे. तसेच, एग्रीकल्चरल डेवलपमेंट ट्रस्ट, बारामती सोबतच्या सहकार्यातून एआय तंत्रज्ञानाचा दृश्यमान आणि मोजता येणारा प्रभाव सिद्ध झाला आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासन जालना आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘जालना सुपर ५० एआय फार्मर्स प्रोग्राम’ अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय-आधारित निर्णय प्रक्रियेचे थेट पाठबळ दिले जात आहे.























