
अक्कलकोट : सध्या पावसाचे दिवस असल्याने अक्कलकोट तालुका व शहर विजेचा लपंडाव सरासपणे चालू आहे त्यामुळे महिला बालके वर्धा व्यक्तींना वीज अभावी उकडण्याचा भरपूर त्रास होत आहे त्यामुळे आपण विजेचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी जे काही अडीअडचणी येत असतील त्या अडीअडचणी म्हणजे विजेचा प्रवाह खंडित ने चालू ठेवण्यासाठी काही ठिकाणी जाण्याचा अथवा तार्याचा किंवा खांब्याचा अडताळे येत असतील त्या अडचणीवर मात करून विजेचा प्रवास खंडित व सुरळीतपणे चालू ठेवावा जेणेकरून वीज अभावी कुणाची कामे किंवा कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन ताबडतोब विजेचा प्रवाहामध्ये येणारे अडथळे दूर करून सर्व अक्कलकोट शहर तालुके गावांना दिलासा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी व जनता सामाजिक बहुउद्देश संस्थेच्या वतीने करण्यात आली या निवेदनाच्या प्रमुख मागणीसाठी उपस्थितीत आरपीआय शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष लिंबाजी कलगुडगे आरपीआय नियोजन प्रमुख सागर पावले पांडुरंग जाधव आरपीआय विभागीय शेतकरी अध्यक्ष दाजी चव्हाण आरपीआय एकतावादी सचिव वसंत राजेगावकर आरपीआय सांस्कृतिक विभाग तालुकाध्यक्ष अशोक शिंदे शेतकरी गोविंद कणसे पप्पू शिंदे शिंदे गुडर शेख संजय सालपे व तसेच विकीबाबा चौधरी प्रदेशाध्यक्ष रोजगार आघाडी आरपीआय एकतावादी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज रोजी निवेदन देण्यात आले.

























