सोलापूर : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांची माहिती, प्रवेश प्रक्रिया, शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच करिअरविषयक मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या प्रवेश मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आज, शुक्रवार दि. १९ जून रोजी सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सीआरटीडीचे संशोधन संचालक तथा माजी कुलगुरू प्रा. एस. एच. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी रेल्वे स्टेशन लाईन डीआरएम कार्यालयाजवळ, दंडवते महाराज मठाशेजारी व बँक ऑफ इंडिया समोर हे प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून अभियांत्रिकी, ज्युनिअर कॉलेज तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंदर्भातील माहिती, शंका निरसन, करिअर समुपदेशन आणि आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना व पालकांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
यावेळी सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे, सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, डॉ. किरण पाटील, डॉ. विजय बिरादार, डॉ. एस. एस. शिरगण, प्रा. फरीद वळसंगकर, प्रा. एच. टी. गुरमे, प्रा. रुपाली चव्हाण, प्रा. अलीम शेख, प्रा. सुवर्णा क्षीरसागर, प्रा. श्रीकांत जगताप तसेच जनसंपर्क अधिकारी रामकृष्ण लांबतुरे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना योग्य शिक्षणाची दिशा मिळावी आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात हे मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांना प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमांची निवड, करिअरच्या संधी तसेच शैक्षणिक पर्यायांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन येथे मिळणार आहे.
या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरणे, कागदपत्रांची पूर्तता, सीईटी व इतर प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती, शिष्यवृत्ती योजनांचे मार्गदर्शन तसेच विविध अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांनी केंद्राची पाहणी करून उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
✓ सिंहगडचा दमदार प्लेसमेंट रेकॉर्ड विद्यार्थ्यांसाठी आकर्षण
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 13.5 लाख रुपये वार्षिक सर्वोच्च पॅकेज मिळाले असून 4.5 लाख रुपये वार्षिक सरासरी पॅकेज मिळाले आहे. तसेच 52 विद्यार्थ्यांना 6 लाखांपेक्षा अधिक, तर 283 विद्यार्थ्यांना 4 लाखांपेक्षा अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
कॉग्निझंटमध्ये 96, कॅपजेमिनीमध्ये 91, टीसीएसमध्ये 68, अॅक्सेंचरमध्ये 64, विप्रोमध्ये 46, यूएमएसमध्ये 46 आणि इन्फोसिसमध्ये 35 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. याशिवाय भारत फोर्ज, अल्ट्राटेक, टाटा ऑटोकॉम्प, व्होडाफोन आयडिया यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्येही विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि उत्कृष्ट प्लेसमेंट सुविधा हे सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वैशिष्ट्य ठरत आहे.
“योग्य शिक्षण संस्थेची निवड आणि प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी सिंहगडचे हे मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ ठरणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करण्यात आलेल्या या केंद्रातून विद्यार्थ्यांना करिअर, प्रवेश, शिष्यवृत्ती आणि विविध अभ्यासक्रमांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.”
— संजय नवले, कॅम्पस डायरेक्टर, सिंहगड इन्स्टिट्यूट, सोलापूर