बार्शी – महाराष्ट्रराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी (बार्शी) येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
“Yoga for Healthy Ageing” या यावर्षीच्या संकल्पनेनुसार आयोजित कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचे समन्वयक श्री. एस. व्ही. मोकाशे यांच्या मार्गदर्शनाखाली योग सत्राचे आयोजन करण्यात आले.
योग प्रशिक्षक डॉ. एस. एम. पाटील, श्री. ए. एस. साळवी व श्री. एन. आर. टिकटे यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानधारणा यांचे प्रात्यक्षिक करून योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. सहभागी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचा संकल्प व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक संतुलन व तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण झाली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. सुजित करपे यांनी कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले याबद्दल संस्थाध्यक्ष श्री. अरुण (दादा) बारबोले व सचिवा सौ. कल्पना (ताई) बारबोले यांनी अभिनंदन व्यक्त करून महाविद्यालयाच्या पुढील सामाजिक उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.