पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर (स्वायत्त) येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एम.ए.,एम.कॉम., एम.एस्सी.आणि एम.सी.ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधण्याचे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.
महाविद्यालयाला NAAC कडून A+ मानांकन (CGPA 3.51) प्राप्त असून रुसा (RUSA) योजनेअंतर्गत लाभार्थी महाविद्यालयाचा दर्जाही मिळाला आहे. महाविद्यालयात अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकवर्ग, अकरावी ते पीएच.डी. पर्यंत शिक्षणाची सुविधा तसेच विविध विषयांमध्ये पदव्युत्तर आणि संशोधनाच्या संधी उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, केंद्र व राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती योजना, सुसज्ज ग्रंथालय, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, डिजिटल वर्गखोल्या, एनसीसी व एनएसएस उपक्रम, ऑन-कॅम्पस प्लेसमेंट सुविधा, पोलीस व आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्याधारित अभ्यासक्रमांची सोय करण्यात आली आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज, गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), गॅप प्रमाणपत्र (लागू असल्यास), आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो सादर करावेत. प्रवेश कार्यालयाची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २.०० अशी आहे.
दरम्यान अधिक माहितीसाठी एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. व एम.सी.ए. विभाग प्रमुखांशी तसेच महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांनी केले आहे.
Post Views: 9