बार्शी – बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक ०११०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)-लातूर स्पेशल एक्सप्रेसचे बार्शी रेल्वे प्रवासी सेलच्यावतीने उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी आणि बार्शीच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीला अधिक चालना मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या प्रवासी सेलच्या सदस्यांनी यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
याप्रसंगी गाडीचे लोको पायलट जयसिंग खोत आणि के. ए. जगदीश यांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होण्यासाठी प्रवासी व रेल्वे प्रशासन यांच्यातील समन्वयाचे महत्त्वही या उपक्रमातून अधोरेखित झाले.
या स्वागतप्रसंगी अजित काळेगोरे, शैलेश वखारिया, कनिष्क बोकेफोडे आदी उपस्थित होते. स्पेशल एक्सप्रेसच्या स्वागतामुळे स्थानकावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बार्शी परिसरातील प्रवाशांना अधिक चांगल्या रेल्वे सुविधा मिळाव्यात, नवीन रेल्वे सेवांना प्रोत्साहन मिळावे आणि बार्शी टाउन स्थानकाचे महत्त्व वाढावे, यासाठी बार्शी रेल्वे प्रवासी सेल सातत्याने प्रयत्नशील आहे.
प्रवाशांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवणे, रेल्वे सुविधांच्या विकासासाठी पाठपुरावा करणे आणि बार्शीची रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेणे, हे सेलचे प्रमुख उद्दिष्ट आहे
Post Views: 23