
पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशाला,कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण येथे कै. वासुदेव बेत व कै. सरस्वती बेत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांकडून विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करण्यात आले त्यानंतर प्राचार्य युवराज मेटे यांनी प्रास्ताविक केले तर पर्यवेक्षिका प्रणिता सामल यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त नागनाथ गंजी होते तसेच विश्वस्त अंबादास गज्जम, नागन्नाथ श्रीरामदास यांची प्रमुख उपस्थिती होती .देणगीदार पराग बेत व डॉ.स्नेहल बेत यांच्यामार्फत गरजू विद्यार्थ्यांना वह्या व कंपास वाटप करण्यात आले. तसेच सदानंद बोगम व शोभना बोगम यांच्या वतीने 80 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी पराग बेत व सदानंद बोगम यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले व परिस्थितीवर मात करून शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास सांगितले. पराग बेत यानी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यानी खूप मेहनत करा ; कष्ट करा , अभ्यास करा असा मोलाचा संदेश दिला. याप्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले,पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगु, मल्लिकार्जुन जोकारे व सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर स्वामी यांनी केले तर अश्विनी म्हैसूर यांनी आभार मानले.




















