पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव हे गाव सातारा _ पंढरपूर महामार्गावरील मुख्य बाजारपेठ असणारे गाव आहे .याठिकाणी गेल्या पाच_ सात वर्षांपासून ह्या महामार्गाचे काम सुरू आहे .( राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548) माञ या महामार्गावरील पुल असो रस्ते असो किंवा पिलीव बसस्थानकावरील काम असो ही कामे अपूर्णच आहेत.याबाबत वारंवार लोकप्रतिनिधींकडे तक्रारी सुद्धा कोणीही दखल घेतली नाही.अगदी केंद्रीय मंञी नितीन गडकरी यांच्याकडे सुद्धा याबाबत तक्रारी करण्यात आल्या पण याची कोणीही दखल घेतलीच नाही.पिलीव येथील निरा उजवा कॅनाॅलवरील पुल, कुसमोड येथील पुल, साळमुखवाडी येथील पुल असो की रस्ता ही कामे अपुर्ण आहेतच. पण पिलीव येथील बसस्थानकावरील डिवहायडरचे काम अपुर्ण आहे.याठिकाणी चांगली झाडे तसेच लाईट लावणे आवश्यक असताना बसस्थानकावरील डिव्हायडरमधये अक्षरश चिलारीची मोठ मोठी झाडे वाढली असुन यामुळे याठिकाणी सतत अपघात घडत आहेत. एवढी चिलारीची झाडे वाढली आहेत.वारंवार यामुळे अपघात घडत आहेत. पुढील महीन्यात आषाढी वारी आहेत. या महामार्गावरुन लाखो भक्त पंढरपुरला जातात त्या अगोदर तरी किमान बसस्थानकावरील डिवहायडरमधील चिलारिची झाडे काढणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीतच आहे .तसेच बसस्थानकावर स्पिड ब्रेकर नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. याची प्रशासनाने दखल घेण्याची आवश्यकता आहे .पण प्रशासनाला कधी जाग येणार असा प्रश्न नागरिकामधुन विचारला जात आहे .पिलीव बसस्थानकावरील डिवहायडरमधील चिलारीची झाडे काढणे, लाईट लावणे, तसेच स्पिड ब्रेकर चा प्रश्न आषाढी वारीपुर्वी मार्गी लावणे आवश्यक आहे . फोटो _ पिलीव बसस्थानकावरील डिवहायडरमध्ये वाढलेली चिलारीची झाडे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















