सांगोला – शहरामधील घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा डेपो) याठिकाणी शहरातील जमा झालेला ओला व सुका कचरा यावरती प्रक्रिया करुन त्यापासून कंपोस्ट खत तयार केला जात आहे. हा कंपोस्ट खत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून विशेषत: ऊस या पिकासाठी अतिशय फायदेशीर ठरत आहे. तरी सांगोला तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना हा कंपोस्ट खत हवा असेल त्यांनी दिवसभर कार्यालयीन वेळेत स्वत:चे वाहन आणून त्यांना हवा तेवढा कंपोस्ट खत घेवून जावा असे आवाहन सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आनंदा माने यांनी केले आहे. तसेच यासाठी शेतकरी हा सांगोला तालुक्यातील असणे गरजेचे आहे व त्यांनी सोबत ७/१२ उतारा व आधार कार्ड घेवून येणे बंधनकारक आहे. तरी तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना खत हवा असेल त्यांनी घनकचरा व्यवस्थापन केंद्र (कचरा डेपो) येथून घेवून जावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.