
सोलापूर – निर्मलकुमार फडकुले पटांगण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे व कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
ब्रिटिश राजवटीत अनेक संस्थानिक होते जे आज कुणाच्या स्मरणात देखील नाहीत. एकमेव छत्रपती शाहू महाराज आज त्यांच्या लोककल्याणकारी कारभाराने जनतेच्या चिर स्मरणात आहेत.
गोर-गरिबांची लेकरं शिकावीत म्हणून प्राथमिक शिक्षण सक्तीचं करणारे, मागासलेला वर्ग मुख्य प्रवाहात यावा म्हणून आरक्षणाचा कायदा करणारे, उद्योग नगरी म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण करणारे, कुस्तीगीरांसाठी खासबाग सारखं मैदान निर्माण करून पहिलवानांना प्रोत्साहन देणारे, राधानगरी सारखं धरण निर्मिती करणारे, धार्मिक विषमतेविरुद्ध कृतिशील धोरण आखणारे द्रष्टे राज्यकर्ते म्हणून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य कालातीत आहे असे मत श्रीकांत डांगे यांनी व्यक्त केले.
यावेळी गजानन जमदाडे, शशिकांत शिंदे, प्रकाश डांगे, सागर ढगे, राज जगताप, सागर दासी, मल्लिकार्जुन पोतदर, अविनाश विटकर, महेश घोडके, रोहन तपासे, सुधाकर करणकोट, प्रदीप मोरे आदि उपस्थित होते.




















