
सोलापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता आणि लोककल्याणकारी विचारांचे महान पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार, मागास व वंचित घटकांना संधी, सामाजिक भेदभाव निर्मूलन, महिला शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजातील दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी ऐतिहासिक कार्य केले. सन 1902 मध्ये त्यांनी मागास घटकांसाठी आरक्षणाची व्यवस्था लागू करून सामाजिक न्यायाचा नवा आदर्श निर्माण केला. जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व मार्गदर्शक डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम, जनजागृती आणि लोककल्याणाची कामे सातत्याने राबविण्यात येत आहेत.
यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समता, न्याय आणि सेवाभावाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी शिरीष जगदाळे, ज्योतिबा गुंड, दिलीप भोसले, शेखर भोसले, श्रेयश माने, सतीश वावरे, प्रशांत देशमुख, अजय सोमदळे, दिलीप निंबाळकर, अजित पाटील, सचिन थोरात, सचिन मस्के, नाना कामाने यांच्यासह जनसेवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




















