बार्शी – महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यातून १३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धकांबरोबर त्यांच्या पालकांचाही उत्साह व उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मदगोंडा पुजारी, श्री. बसवराज पुरवंत लाभले. प्रमुख उपस्थिती गोपाल कबाडे, महादेव सर्जापूर, सदाशिव कबाडे हे होते. ही स्पर्धा सौ. वनुजा कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सूत्रसंचालन संस्कृती थळपती यांनी केले.
बक्षीस वितरणाच्या प्रारंभी विनोद कबाडे यांनी प्रमुख उपस्थितांचे हार,शाल व स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केले. हे स्पर्धेचे युग असून स्पर्धांमधूनच स्वतःचे मूल्यमापन कळते. तसेच यशस्वी माणूस घडतो. त्यामुळे स्पर्धांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून आपली प्रगती साधावी, असे विचार श्री. पुजारी सर यांनी व्यक्त केले. श्री. बसवराज पुरवंत यांनी व्ही के इन्स्टिट्यूट बार्शी ही उपक्रमशील संस्था असून सातत्याने समाज उपयोगी कार्यामध्ये अग्रेसर आहे. केवळ समाजाचे हित लक्षात ठेवून या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पारितोषिक विजेत्यांची नावे- अबॅकस स्पर्धा- अर्णव चंद्रजी मोरे प्रथम क्रमांक. रेंजर सायकल- सिद्धार्थ चन्नबसप्पा कोटाळी द्वितीय- स्मार्ट वॉच, स्वराली राहुल पांढरे तृतीय वॉटरप्रूफ बॅगचे मानकरी ठरले.
वेदिक गणित चॅम्पियन ट्रॉफी- कु.भारती सुरेश मस्तुद यांनी पटकावली. विनोद कबाडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत कबाडे, प्रथमेश निरंजन, रवी मेळे, गंगाधर सर्जापूर, शिवानंद सर्जापूर, यशराज कबाडे, राकेश मेळे यांचे सहकार्य लाभले.
Post Views: 54