टेंभुर्णी – आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख युवा आघाडी या महत्त्वाच्या पदावर श्री. नवनाथ पवार यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी ऑनलाईन नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली.
नवनाथ पवार यांच्या निवडीमुळे संघटनेच्या युवा आघाडीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. संघटनात्मक कार्य, युवकांशी सातत्याने संपर्क आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या निवडीचे स्वागत करत महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माया देशमुख, महिला आघाडी राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेत्या शिवशंभू प्रिया जांभळे, इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सरलष्कर महेंद्र नाईक निंबाळकर तसेच महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भानुदास वाबळे पाटील यांनी नवनाथ पवार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक आघाडी कार्याध्यक्ष लखन घाडगे पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिपक पवार, महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष उत्तम बिरादर आणि महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. रामकिशन शेळके यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या.
तसेच रुपेश दळवी, अभिजित खैरे, राम इढोळे यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी नवनाथ पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत संघटनेच्या माध्यमातून सामाजिक व संघटनात्मक कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.
Post Views: 14