
पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील जामा मशिदीच्या पुढाकाराने व मानाच्या सारवान गल्लीतील अलहुशानी मशिदीच्या मानकरी सय्यद कुटुंबीयांच्या वतीने मोहरम निमित्त ताबूतचे डोले यांची पिलीव च्या मुख्य पेठेतून वाजत गाजत लढाई सुदृश्य समूह नृत्य करीत मिरवणूक काढून धार्मिक पद्धतीने मुस्लिम स्मशानभूमीत ताबुतांचे (डोले )विसर्जन करण्यात आले. मानवी कल्याणाच्या हितासाठी झालेल्या धार्मिक लढ्यात मोहम्मद पैगंबराचे नातू हसन हुसेन यांचा कुटुंबातील 72 सदस्यासह त्यात लहान मुलांचाही समावेश असलेल्या परिवारांचे हौतात्म्य किंवा बलिदान दिले होते म्हणून हसेन हुसेन च्या परिवारातील बहात्तर(72) व्यक्तींच्या स्मरणार्थ मोहरम सण साजरा केला जातो. यामध्ये सालाबादप्रमाणे जामा मशीद च्या संचालक मंडळ व सारवान गल्लीतील अलहुशानी मशिदीच्या वतीने सजवलेल्या ताबूतची डोल्या़ची वाजत गाजत समुहनृत्य करीत मिरवणूक काढण्यात आली होती .त्याच पद्धतीने एक दिवस अगोदर आदल्या रात्री सजवलेल्या ताबूतची कत्तलची रात दोन्ही समाजांच्या सहभागाने साजरी केली जाते. यावेळी जामा मशिदीचे सलीम मुलाणी ,सचिव नजीर मुलांणी, महिबूब मुलाणी ,जाफर मुलाणी, हरून मुलांनी ,हुसेन मुलाणी, आमिनखान पठाण ,बाबा सय्यद, अमन सय्यद, निसार सय्यद, वाहीद सय्यद ,अरमान शेख, जिशान शेख, शकील शेख ,फरदीन पठाण, सोहेल काझी, साबीर सय्यद,इरफान शेख, साजिद शेख अजिज पठाण ,आमन सय्यद, वाहिद सय्यद ,समीन खान पठाण, आमिरखान शेख ,सद्दाम पठाण, आरमान तांबोळी ,आदी ज्येष्ठ व तरुण कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
Post Views: 9