‘पूर्वीच्या ऋषीमुनींनी आपल्या ज्ञानसाधनेद्वारे जी ग्रंथसंपदा लिहिली आहे त्याचे जतन व अध्ययन केले तर ते खरे ग्रंथ पूजन आहे.’ असे उद्गार प्रसिद्ध अभियांत्रिकी तज्ञ प्रकर्ष संगवे यांनी वालचंद महाविद्यालयातील श्रुतपंचमी पर्व पूजन प्रसंगी काढले. ‘ग्रंथसंपदा ही सर्वांसाठीच महत्त्वाची आहे. सर्वसामान्य विद्यार्थिनी ही याकडे गांभीर्याने लक्ष देऊन याचा प्रचार प्रसार केला पाहिजे.’ असे विचार सौ साधना संगवे यांनी मांडले.
‘प्राकृत, संस्कृत भाषेत पूर्वाचार्यांनी ग्रंथ लेखन केले त्याचे पुनर्पठण व्हावे.’ असे उद्गार स्वागतपर प्रास्ताविकात डॉ महावीर शास्त्री यांनी केले.
‘सध्या भारत सरकार ज्ञानभारतम याद्वारे हस्तलिखितांचे जतन करत आहे त्यामध्ये वालचंद महाविद्यालयातील ग्रंथ हे नक्कीच मोलाची भर घालत आहेत.’ असे उद्गार प्राचार्य डॉ संतोष कोटी यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.
याप्रसंगी अनेक मौलिक ग्रंथांचे प्रदर्शन करण्यात आले होते. याप्रसंगी यासंबंधात विशेष अध्ययन करत प्राविण्य प्राप्त केलेल्या आकांक्षा टुनकी, सानिया शेख, नागमणी लोकुर्ते, नंदिनी जाधव, श्रुती येले या विद्यार्थिनींना मानपत्रासह गौरविण्यात आले. आभार ग्रंथपाल डॉ वंदना गवळी यांनी व्यक्त केले. डॉ महावीर साबळे यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ मनोहर जोशी, डॉ राजशेखर हिप्परगी, श्री अनुप म्हेत्रे, आदगोंडा पाटील, मनोज मुळकुटकर, डॉ नागनाथ धायगुडे, प्रा हनुमंत मते, डॉ गोविंद तोडकरी, डॉ जीवराज कस्तुरे, चंद्रशेखर कस्तुरे, रवींद्र काळे, विजय काळेगोरे, संदेश बोराळकर, राजकुमार कस्तुरकर, अजय देवधरे, बाहुबली कुगे, बाहुबली शेटगार, डॉ माधुरी शास्त्री, सौ वैशाली गांधी, मनीषा कडप्पा, वंदना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 31