सदर स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अँड.श्रीनिवास क्यातम हे उपस्थित होते. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ वर्षासाठी आर्ट्स, कॉमर्स , शास्त्र व व्यवसाय शिक्षण विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे सर्वप्रथम कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे नवीन उमेद जिद्द व आपण शालेय जीवनातून कॉलेज जीवनात प्रवेश करत असल्याचा आनंद दिसत होता.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभा वेळी विद्यार्थ्यांना संबोधन करताना, अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयाचे नियम व शिस्त शिक्षणाचे महत्व तसेच महाविद्यालयात असलेल्या शैक्षणिक सुविधा या संदर्भात मार्गदर्शन केले. सदर स्वागत समारंभा वेळी प्राचार्य. युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर व महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शीतल कुलकर्णी यांनी केले.






















