सोलापूर : सिद्धेश्वर पेठ पंचकट्टा येथील मनपा मुलांची मराठी केंद्रशाळा क्र. 9 सोलापूर या शाळेमध्ये दिवंगत सुधामती लिंबाजी शिरसाट यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शेषराव शिरसाट यांच्या वतीने शालेय
इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्याथ्यर्थ्यांना दप्तर, पेन, व वही असे लेखन साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वहीदबी शेख, नगरसेवक अशपाक बाबा शेख, शेषराव शिरसाट, शामल शिरसाट, मनपा आरोग्य निरीक्षक सोमनाथ सिद्धगणेश, महापालिका चतुर्थश्रेणी कर्मचारी पतसंस्थेचे माजी चेअरमन भालचंद्र साखरे, मुख्याध्यापिका पंचशीला कांबळे, कयूम शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.
संयोजक शेषराव शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपत आईच्या स्मरणार्थ दरवर्षी असे उपक्रम राबविण्यात येतात असे सांगून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
सूत्रसंचालन धानेवश्री चौगुले तर शाबाद काजी यांनी आभार प्रदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका पंचशील कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका पंचशीला कांबळे, धानेवश्री चौगुले, शाबाद काजी, हेमलता देवनपल्ली, अनुसया सुरवसे, जमादार रवी कांबळे, श्रीधर कदम, कमलाकर कांबळे यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 44