Monday, August 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
July 2, 2026
in solapur
0
महापालिकेच्या सात विषय समिती सभापतीपदासाठी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या कारभारात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्वतंत्र बजेट असलेल्या महिला व बालकल्याण समितीसह विविध ७ समित्यांच्या सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज नगरसचिव कार्यालयात दाखल करण्यात आले. यामुळे ही निवड बिनविरोध निश्चित झाली असून यावर शुक्रवारी होणाऱ्या सभेत औपचारिक शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. या निवडीतून विधानसभा मतदारसंघ आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केल्याचे दिसून येते. शहर उत्तर सोलापूर मतदार संघाला झुकते माप देत तीन सभापतीचा मान मिळाला आहे.
              सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विषय समितींच्या सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी आज महानगरपालिका मुख्यालयातील नगरसचिव कार्यालयात महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका सौ. रोहिणी ताई तडवळकर तसेच इतर पदाधिकारी आणि नगरसेवक-नगरसेविकांच्या समवेत इच्छुक उमेदवारांनी नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. सातही समिती सभापती पदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाले आहेत. प्रारंभी सकाळी सभागृह नेत्यांच्या कार्यालयात पार्टी मीटिंग पार पडली. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
             शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासनाने मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियमाचे नियम २००७ आणि २००८ च्या अधिसूचनेनुसार सुधारणा करून मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम २००८ मध्ये संमत केलेले असून त्यानुसार समित्या व इतर समित्यांच्या सभापतींच्या निवडणुकीसाठीच्या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त अथवा त्यांच्या प्रतिनिधी असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार, शुक्रवार दि. ३ मे रोजी महापालिका कौन्सिल हाॅलमधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापालिकेच्या स्थापत्य समिती, वैद्यकीय सहाय व आरोग्य समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, मंड्या व उद्यान समिती, कामगार व समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती या सात विषय सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया याच क्रमवारीनुसार सकाळी ११ वाजता
सुरू होणार आहे. यानंतर एकेक समितीला टप्प्याटप्प्याने ११:३०, १२ आणि दुपारी १२:३०, १,  व २ वाजता प्रत्येक समितीसाठी स्वतंत्रपणे मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया होणार आहे. प्रत्येकी एक अर्ज आल्यामुळे ही बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्यावर शुक्रवारी होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब होईल.
यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल
यामध्ये स्थापत्य समिती सभापतीपदासाठी विजय चिप्पा (शहर मध्य), विधी समिती सभापतीपदासाठी सत्यजित वाघमोडे (दक्षिण सोलापूर), वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतीपदासाठी सुनील खटके (शहर उत्तर), शहर सुधारणा समिती सभापतीपदासाठी स्वाती बडगु (शहर उत्तर), मंडई व उद्यान समिती सभापतीपदासाठी राजशेखर पाटील (दक्षिण सोलापूर), कामगार व समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी श्रद्धा पवार (शहर उत्तर) तसेच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी निर्मला जंगम ( शहर मध्य) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, शहराध्यक्ष तसेच पदाधिकारी व नगरसेवक-नगरसेविकांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
प्रत्येक समितीत भाजपाचे ८ तर
एमआयएमचा १ सदस्य
महापालिकेत सध्या भाजपाचे १०२ पैकी ८७ सदस्य असून आमदारांच्या गटांमध्ये सभापतीपदासाठी जोरदार हालचाली झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली.महापालिकेच्या विशेष सात समित्यांमध्ये प्रत्येक समितीत ९ सदस्य असून यामध्ये भाजपाचे ८ तर एमआयएमचा १ सदस्य आहे. या समित्यांमध्ये प्रथमच काँग्रेससह शिवसेनेचा एकही सदस्य नाही.प्रत्येक उमेदवाराला अनुमोदक -सूचक असे दोन सदस्य आवश्यक असतात मात्र पक्षीय बलाबलानुसार एमआयएम या पक्षाला प्रत्येक समितीत एक सदस्य असल्याने त्यांना उमेदवारी अर्ज भरता येऊ शकत नाही. यामुळे भाजप उमेदवारांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याचे दिसून येते.
महिला व बालकल्याण समितीसाठी
 अडीच कोटीचा निधी, सभापतींसाठी गाडी
महिला व बालकल्याण समितीचे सभापतीपद सर्वात महत्त्वाचे मानले जात असल्याने त्यासाठी चुरस पाहायला मिळाली. या समितीसाठी सुमारे दोन ते अडीच कोटीचा निधी उपलब्ध असतो. तसेच महापालिकेकडून सभापतीसाठी गाडी मिळते. या समिती सभापतीसाठी
निर्मला जंगम ( शहर मध्य) यांची वर्णी लागली आहे.
सोलापूर शहर उत्तरला झुकते माप
एकूण सात समित्यांपैकी तब्बल तीन सभापती हे सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील आहे. यामुळे या मतदारसंघाला झुकते माप मिळाले आहे. शहर मध्य आणि सोलापूर दक्षिण या दोन्ही विधानसभा मतदारसंघाला प्रत्येकी दोन सभापतीचा मान मिळाला आहे. या निवडी करीत असताना विधानसभा मतदारसंघ आणि सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचे दिसून येते. स्थापत्य समिती आणि महिला बाल कल्याण समिती महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही समित्या सभापती शहर मध्यकडे आहेत.
Post Views: 96
Previous Post

सोलापुरात आजपासून वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा  

Next Post

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

ताज्या बातम्या

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

‘मीडिया मास्टर’ पुस्तकाचा बुधवारी प्रकाशन सोहळा

August 23, 2026
नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

नवीन वर्गखोली उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

August 23, 2026
देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

देहू-आळंदीच्या धर्तीवर हन्नूरच्या हरणा नदीकाठी होणार घाट

August 23, 2026

प्लास्टिक टाळा, पर्यावरण वाचवा, प्लास्टिकला ‘नाही’ म्हणा; निरोगी भविष्यासाठी आजच सवय बदला

August 23, 2026

महसूल गळती, आश्रमशाळा अन् रस्ता सुरक्षेवर अधिकाऱ्यांची खरडपट्टी

August 23, 2026

डॉ. आर. आर. पाटील यांना करिअर डेव्हलपमेंट व ट्रेनिंग-प्लेसमेंट क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार

August 23, 2026
सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

सिंहगड पब्लिक स्कूलच्या सहा खेळाडूंची भारतीय संघात निवड

August 23, 2026

निधी खात्यावर, कामे कागदावर; ८५ कोटी खात्यावर; विकासकामे मात्र ठप्प!

August 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1110218

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!