मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने आज आपल्या स्थापनेपासून जून महिन्यातील आतापर्यंतची सर्वोच्च विक्री जाहीर केली आहे. जून २०२५ मध्ये विकल्या गेलेल्या २०,६२५ युनिट्सच्या तुलनेत यंदा जून महिन्यात २४,५५२ युनिट्सची घाऊक विक्री झाली आहे, ज्यामध्ये वार्षिक १९ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. या प्रबळ कामगिरीमधून कंपनीचा सातत्यपूर्ण विकास आणि कंपनीच्या प्रगत उत्पादन श्रेणीला ग्राहकांकडून मिळणारी चांगली पसंती दिसून येते.
वर्ष २०२६ च्या पहिल्या सहा महिन्यांत किया इंडियाने १,६३,७४९ युनिट्सची विक्री केली, जी कंपनीची पहिल्या सहामाहीमधील आजवरची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत झालेल्या १,४२,१३९ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत यात वार्षिक १५.२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामधून ग्राहकांच्या बदलत्या आवडीनिवडींनुसार उत्पादने उपलब्ध करून देण्यावर किया इंडियाचा असलेला सातत्यपूर्ण भर दिसून येतो. कॉम्पॅक्ट एसयूव्ही, मिड-सादझ एसयूव्ही, रिक्रिएशनल वेईकल्स आणि इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स अशा संतुलित उत्पादन श्रेणीच्या जोरावर कंपनीने भारतातील पॅसेंजर वेईकल बाजारपेठेमधील महत्त्वाच्या आणि वेगाने वाढणाऱ्या सेगमेंटमध्ये आपले स्थान अढळ ठेवले आहे. या कामगिरीमधून तंत्रज्ञानावर आधारित, वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रीमियम मोबिलिटी सोल्यूशन्ससाठी ग्राहकांची वाढती पसंती देखील निदर्शनास येते, जे आता किया ब्रँडचे मुख्य वैशिष्ट्य बनले आहे.
किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे सीनियर व्हाईस-प्रेसिडेंट श्री. अतुल सूद म्हणाले, “वर्षातील पहिल्या सहामाहीची एका नव्या विक्रमी पातळीवर सांगता करणे आणि जून महिन्यात आजवरची सर्वोच्च विक्री नोंदवणे हा किया इंडियासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यामधून ग्राहक आमच्या ब्रँडवर सतत दाखवत असलेला विश्वास दिसून येतो. नवीन सेल्टोस, सोनेट (Sonet) आणि कॅरेन्स क्लॅव्हिस यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे ही कामगिरी शक्य झाली आहे, तसेच एमवाय२६ सिरॉसला देखील ग्राहकांकडून उत्साही प्रतिसाद मिळाला आहे. कियाचे विद्यमान ग्राहक नवीन सेल्टोस खरेदी करून स्वतःला अपग्रेड करत आहेत हे पाहणे विशेष आनंदाचे आहे, ज्यामुळे आमच्या उत्पादनांच्या प्रबळ मूल्याची क्षमता पुन्हा एकदा दिसून आली आहे. अनुकूल सरकारी धोरणे, ईव्हीचा वाढता स्वीकार आणि आम्ही अलीकडेच सुरू केलेला बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) प्रोग्राम यांच्या पाठबळामुळे क्लॅव्हिस ईव्हीला ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या वर्षातील दुसऱ्या सहामाहीत पाऊल ठेवताना आम्ही नाविन्यपूर्ण मोबिलिटी सोल्यूशन्स प्रदान करण्यासाठी, ग्राहकांचा मालकीचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
किया इंडियाने भारतीय ऑटोमोबाईल बाजारपेठेत आपली पकड अधिक मजबूत केली आहे. कंपनीची सर्वात यशस्वी मिड-साइझ एसयूव्ही नवीन सेल्टोस तिच्या आकर्षक डिझाइन आणि प्रगत तंत्रज्ञानासह सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे, जिला ५-स्टार भारत एनसीएपी रेटिंग मिळाले असून ती भारतातील सर्वाधिक स्कोअर करणारी आयसीई कार ठरली आहे. सोनेट, कॅरेन्स, क्लॅव्हिस आणि एमवाय२६ किया सिरॉस या मॉडेल्सनी देखील ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करत कंपनीच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. शाश्वत मोबिलिटीला चालना देण्यासाठी कियाने क्लॅव्हिस ईव्हीच्या माध्यमातून प्रीमियम इलेक्ट्रिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारे बनवले आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी किया इंडियाचे जाळे आज देशातील ४०७ शहरांमध्ये ८९२ टचपॉइंट्सपर्यंत विस्तारले आहे; ज्यामध्ये त्वरित पेमेंट आणि विनासायास एक्सचेंजची सुविधा देणारे १३३ सर्टिफाइड प्री-ओन्ड आउटलेट्स देखील समाविष्ट आहेत.






















