सोलापूर : वंचित बहुजन युवा आघाडी, सोलापूर शहराच्या वतीने आज भव्य सभासद नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रतिमापूजनाने करण्यात आली.
यावेळी शहर महासचिव अनिरुद्ध वाघमारे, संजय हरिजन व मल्लिकार्जुन हिरेमठ यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी युवा शहर अध्यक्ष महेश जाधव, महासचिव नरेंद्र शिंदे, चंद्रकांत सुरवसे, रोहित लालसरे, गौतम थापटे, रितेश दुपारगुडे, सौरभ चवरे, शुभम कसबे, विनोद जाधव, अमित बनसोडे, सचिन गायकवाड, अमित मस्के, सिद्धू शिवशरण यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून तरुणांना संघटित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समाजनिर्मितीसाठी हे सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोलापूर शहरातील युवकांनी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.