पंढरपूर – रोटरी क्लब पंढरपूर (डिस्ट्रीक्ट ३१३२) यांच्या वतीने सन २०२६-२०२७ या वर्षासाठी नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी रोड, पंढरपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सोहळ्यात रो.मिलिंद वंजारी यांनी अध्यक्षपदाचा तर रो.अदनान बोहरी यांनी सचिवपदाचा पदभार स्वीकारला. तसेच नव्या संचालक मंडळानेही आपल्या पदाची शपथ घेऊन सामाजिक कार्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास पी.डी.जी.रो.स्वाती हेरकल (डीआरएफसी २०२५-२८) तसेच रो.डॉ.अक्षय मोरे (असिस्टंट गव्हर्नर २०२६-२७) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी रोटरीच्या सेवाभावी उपक्रमांचा गौरव करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आणि समाजहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी मावळते अध्यक्ष रो.डॉ.वैभव सदिगाले यांनी आपल्या कार्यकाळातील विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. मावळते सचिव रो.मयूर परिचारक यांनीही वर्षभरातील कार्याचा लेखाजोखा सादर केला.
कार्यक्रमास रोटरीचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.
Post Views: 12