पंढरपूर – लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमच्या नूतन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. या क्लब कडून डाँक्टर्स, कृषी आणि सीए दिन साजरा करुन त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
नुकताच १ जुलै या दिवशी डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला. या दिना निमित्त येथील डॉ.संग्राम गायकवाड, डॉ.मंदार सोनवणे, डॉ.सूरज तंटक, डॉ. किरण बहिरवाडे, डॉ.अमित इनामदार, डॉ.प्रेरणा देवकते, डॉ. स्नेहल मोहिते, डॉ.कुलदीप कोलपाकवार या वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या बरोबरच सीए डे निमित्त येथील करसल्लागार अर्थात सीए अमोल भालेराव, अंकुश कौलवार, पवनकुमार झंवर, अतुल कौलवार, शुभम दोमकुंडवार, ध्रुव कौलवार आणि आदित्य कौलवार या करसल्लागार मंडळींचा देखील सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.शार्दूल नलबिलवार, मावळते अध्यक्ष ला.मंदार सोनवणे, सचिवा ला.संध्या खिस्ते, खजिनदार ला.गणेश यलमार पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले तर ला. डॉ. अमित इनामदार आभार यांनी व्यक्त केले.
——————
चौकट ( कृषी दिन देखील साजरा )
महाराष्ट्र कृषी दिना निमित्त येथील सुमित दोशी या प्रगतशील शेती करणाऱ्या युवकाचा देखील यावेळी सन्मान करून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांबद्दल देखील आम्हाला गर्व असल्याची भावना या निमित्त लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांकडून दाखविण्यात आली.
Post Views: 12