सांगोला – सामाजिक बांधिलकी जपण्यात आणि लोकोपयोगी कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठान, सांगोला या नोंदणीकृत संस्थेला देणगीदारांकडून मोठा पाठिंबा मिळाला आहे. दि.३१ मे ते ३० जून कालावधीत संस्थेला देणगी स्वरूपात ३५ हजार ९६५ रुपये निधी तसेच शैक्षणिक साहित्य आणि २ नवीन, २४ जुन्या सायकल देखील देणगी म्हणून दिल्या आहेत. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे.
देणगीदारांमध्ये प्रा.कमलाकर महामुनी, वसंत माने, प्रदीप बनसोडे, अनिल इंगवले, न्या.तेजवंत सिंघ संधू, राजेंद्र बिरगे, श्रीकांत देशपांडे, कुमार कांबळे, अमोल बाबर, प्रा. महादेव उपलाने, अनामिक तसेच शैक्षणिक साहित्य देणाऱ्यांमध्ये राकेश ढाणके, स्वरूप अरबळी, राजकुमार बनसोडे, विलास नलवडे, बापूसाहेब ठोकळे, रविंद खंडागळे, काकासाहेब चन्ने यांचा समावेश आहे. तर अण्णासो इंगवले यांनी २ नवीन सायकल भेट दिल्या.
कै.पोपट नलावडे यांच्या स्मरणार्थ आकाश नलावडे यांच्याकडून रुग्णांच्या सेवेसाठी १ हॉस्पीटल बेड भेट मिळाला आहे. त्याचबरोबर जुन्या २४ सायकल देणगीदारांनी दिल्या असून त्या दुरुस्त करून गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्या जात आहेत.
चौकट-
सहकार्यासाठी आवाहन
जाणीव सामाजिक बांधिलकीची हे ब्रीदवाक्य घेऊन चालणाऱ्या आपुलकी प्रतिष्ठानने नागरिकांना आगामी काळातही अशीच यथाशक्ती देणगी देऊन सहकार्य करत राहण्याचे आवाहन केले आहे. मदत करण्यासाठी संपर्क/फोन.पे.नं.९०११७०७०८०
Post Views: 14