सांगोला – तालुक्यातील खिलारवाडी येथे माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते खिलारवाडी (बागल वस्ती) ते हलदहिवडी या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. याप्रसंगी जि.प.सदस्य दादासाहेब लवटे, पं.स.सदस्य बाळासाहेब बंडगर, उमेश पाटील, मानाजी खिलारी, प्रल्हाद खांडेकर, शंतनू खिलारी, सिद्धेश्वर गाडे, अमित पाटील, ओंकार पाटील, उमेश चव्हाण, विकास इंगोले, विजयसिंह खबाले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यामुळे खिलारवाडी, हलदहिवडी, गायगव्हाण, तिसंगी, गार्डी आणि शिरभावी या गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यावेळी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, मी आमदार असो वा नसो, तालुक्यातील तळागाळातील सर्वसामान्य माणसाच्या मूलभूत प्रश्नांसाठी कायमचा आग्रही राहीन. राज्यातील वरिष्ठ नेत्यांकडून तालुक्याच्या सर्व विकास प्रकल्पांसाठी लवकरात लवकर निधी आणून सर्व कामे पूर्णत्वास नेईन. तसेच या भागातील पाण्याच्या कॅनॉलचा फाटा प्रश्न लवकरच कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.


















